पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा हर्सूल तलावात मृत्यू

By Admin | Published: March 15, 2017 08:21 PM2017-03-15T20:21:50+5:302017-03-15T20:21:50+5:30

हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना

Two friends went to the swimming place in Hersole Lake | पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा हर्सूल तलावात मृत्यू

पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा हर्सूल तलावात मृत्यू

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 15 - हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. हे दोन्ही तरुण मंगळवारी दुपारी ४ वाजता घरातून बाहेर पडले होते. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुफीयान शहा रज्जाक शहा(१७,रा. किराडपुरा) आणि समी खान अकबर खान (२२,रा. मिसरवाडी)अशी मृतांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सुफीयान आणि समी हे दोघेही जिवलग मित्र. समी हा बी.ए.उर्त्तीण असून तो पोलीस भरतीची तयारी करीत होता.शिवाय त्याने एका संस्थेत कॉम्प्युटरचा कोर्सलाही प्रवेश घेतला होता. नियमित पोलीस भरतीचा सराव तो करीत असत. तर सुफीयान हा रजिया फातेमा कॉलेजमध्ये बारावीला होता. बारावी बोर्ड परीक्षा तो देत होता. त्याचा एकच पेपर शिल्लक राहिला होता आणि या पेपरची परीक्षा २५ मार्च रोजी होणार होती. दोघे चांगले मित्र असल्याने ते ऐकमेकांच्या संपर्कात असत. मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समी हा मोटारसायकल घेऊन किराडपुऱ्यात सुफीयानच्या घरी गेला. यानंतर ते दोघे मोटारसायकलने हर्सूल तलाव परिसरात फिरायला गेले. तलावाच्या मागील बाजूला काठावर दुचाकी उभी केल्यानंतर त्यांना तलावात पोहण्याचे आकर्षण झाले आणि हे आकर्षणच त्यांच्या जिवावर बेतले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. असे असताना ते तलावात उतरले. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज त्यांना आला नाही. पाण्यात उतरल्यावर ते अचानक खोल पाण्यात गेल्याने बुडाले असावे, असा अंदाज पोलीस निरीक्षक ज््ञानेश्वर साबळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की,एक जण पाण्यात बुडत असल्याचे पाहुन दुसरा त्याच्या मदतीला गेला मात्र त्यासही पोहायला येत नसल्याने ते बुडाले.
पोलिसांत नोंदविली तक्रार
रात्री ८ वाजेनंतर घराबाहेर कधीही न राहणारा सुफियान घरी आला नाही. शिवाय समी आणि सुफीयान हे मोबाईल उचलत नसल्याने दोघांचे नातेवाईक घाबरले होते. सुफियानच्या वडिलांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तर समीच्या भावांनी सिडको ठाण्यात रात्री धाव घेत दोघे हरवल्याची तक्रार केली होती.
चपला आणि मोटारसायकल होती काठावर
तलावाच्या काठावर चप्पलांचे दोन जोड आणि मोटारसायकल होती. मासेमारी करणाऱ्यांनी याबाबतची माहिती बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हर्सूल पोलिसांना दिली. नंतर अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जवानांनी शोध घेऊन सायंकाळी साडेचार वाजता दोघांचे प्रेत पाण्याबाहेर काढले.

Web Title: Two friends went to the swimming place in Hersole Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.