पुण्यात दोन मैत्रिणींची आत्महत्या

By Admin | Published: July 21, 2016 05:05 AM2016-07-21T05:05:49+5:302016-07-21T05:05:49+5:30

डगाव शेरी येथील दोन मुलींनी एकमेकींचे हात बांधून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली़

Two girlfriends suicides in Pune | पुण्यात दोन मैत्रिणींची आत्महत्या

पुण्यात दोन मैत्रिणींची आत्महत्या

googlenewsNext


पुणे : वडगाव शेरी येथील दोन मुलींनी एकमेकींचे हात बांधून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली़ स्रेहा सदानंद मोरे (१५) आणि छोटीकुमार अजितकुमार सिंग (१५) अशी त्यांची नावे आहेत़ या मुलींचे प्रेमसंबंध असल्याचे व ते पालकांना समजल्याने ते रागावतील, या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे़
शनिवारी सकाळी त्या व त्यांच्या आणखी दोन मैत्रिणी शनिवारी १६ जुलै रोजी सकाळी फुटबॉल मॅच खेळायला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडल्या़ त्यानंतर, त्यांनी त्यांच्या चार मित्रांना फोन करून बोलावून घेतले. मग ते सर्व दुचाकीहून खराडीतील डॅमवर आले. खराडी डॅमवरून त्याचे मित्र निघून गेले़ त्यांनतर, चौघींपैकी एकीच्या घरी त्या सर्व जणी जेवणासाठी गेल्या. जेवण करत असतानाच दोघींना (स्नेहा व छोटीकुमारी) एकाच वेळी घरून फोन आला व त्यातील छोटीकुमारीला तिच्या बहिणीने फोन करून सांगितले की, तुम्ही शाळेत गेला नाहीत, हे वडिलांना समजले असून, ते खूप चिडले आहेत. असे बोलल्यानंतर त्या दोघी तेथून दीडच्या दरम्यान निघून गेल्या.
छोटीकुमारी व स्नेहा यांनी त्यांच्या मित्रांना चार वाजता फोन करून सांगितले की, आमच्या घरी समजले आहे. त्यामुळे आम्ही आत्महत्या करत आहोत. त्यांनतर त्या दोघींच्या मित्रांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाइल बंद होता. दोघी घरी न आल्याने त्यांच्या घरच्यांनी चंदननगर पोलिसांकडे तक्रार दिली़ (प्रतिनिधी)
वडगावशेरी येथील स्मशानभूमीजवळ कुमार प्रायमवेरा सोसायटीसमोर नदीपात्रात बुधवारी त्यांचे मृतदेह आढळले़ एकीचा उजवा व दुसरीचा डावा हात बांधून दोघींनी नदीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी बूट, शालेय दप्तर व खेळाचे साहित्य सापडले असून, ही आत्महत्याच असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Web Title: Two girlfriends suicides in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.