कारंजात दोन गटांत हाणामारी, एकाचा मृत्यू
By admin | Published: July 15, 2015 12:02 AM2015-07-15T00:02:36+5:302015-07-15T00:02:36+5:30
युवतीच्या छेडछाडीवरून दोन गटात दंगल उसळून, एका युवकाचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाशिम जिल्ह्णातील कारंजा येथे घडली.
वाशिम : युवतीच्या छेडछाडीवरून दोन गटात दंगल उसळून, एका युवकाचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाशिम जिल्ह्णातील कारंजा येथे घडली. शहरात तणावपूर्ण परिस्थिती असून, पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
कारंजा शहरातील शिवाजी नगर भागात राहणाऱ्या एका युवतीची भारतीपूरा परिसरात राहणाऱ्या सोहेल अब्दुल गफार या युवकाने मंगळवारी सकाळी छेड काढली. त्यामुळे परिसरातील तरुणांनी सोहेलला मारहाण करीत पोलिस स्टेशनमध्ये नेले. याप्रकरणी युवतीने दाखल केलेल्या तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी कारवाई सुरू केली. या घटनेने संतप्त झालेल्या काही युवकांनी नेव्हीपुरा परिसरात जमाव क रून क ाही युवकांना मारहाण केली. यामुळे परिसरात तणाव झाला.
भारतीपुरा परिसरातील युवकांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी राम मंदीर परिसरात येऊन दगडफे क सुरू केली. त्यानंतर काही युवकांनी बाबू उर्फ सजाउद्दिन इस्लामोद्दिन आणि अस्लम नामक दोन युवकांना धारदार शस्त्रांनी गंभीर जखमी केले.
पोलिसांनी दोघांनाही कारंजा ग्रामीण रुग्णालयात भरती केले; मात्र डॉक्टरांनी बाबूला मृत घोषित केले, तर अस्लमला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले.
ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांशी सतत संपर्कात असून, अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री, वाशिम
कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीसांना सहकार्य करावे.
- विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम