सहकारनगरमध्ये दोन गटांत दगडफेक
By admin | Published: June 10, 2016 12:54 AM2016-06-10T00:54:14+5:302016-06-10T00:54:14+5:30
समाज मंदिराच्या वादावरुन झालेल्या दोन गटात दगडफेक होऊन सुभाष जगताप व त्यांचे तीन कार्यकर्ते जखमी झाले़ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सहकारनगर : सहकारनगरमधील अण्णा भाऊ साठे जवळ असलेल्या नानासाहेब धर्माधिकारी संकुलाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी नगरसेवक सुभाष जगताप व पुणे महापालिकेचे अधिकारी गेले असता समाज मंदिराच्या वादावरुन झालेल्या दोन गटात दगडफेक होऊन सुभाष जगताप व त्यांचे तीन कार्यकर्ते जखमी झाले़ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अण्णा भाऊ साठे वसाहतीतील नानासाहेब धर्माधिकारी संकुलाला स्थानिकांचा विरोध आहे. या संकुलाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली आहे. त्याची पाहणी करण्यासाठी सुभाष जगताप व महापालिकेचे अधिकारी गेले होते. तेव्हा मोकळया मैदानात अण्णा भाऊ साठे वसाहतीमधील काही मुले क्रिकेट खेळत होती. या मुलांना येथे येऊन का खेळता, असे विचारले. तसेच त्यांना बाहेर काढले. या वेळी सुभाष जगताप व येथील त्रिबंक अवचिते यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर थेट दगडफेक झाल्याने त्यात नगरसेवक सुभाष जगताप यांच्या डोक्याला मार लागला़ या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.