दोन ‘हायटेक’ कॉपीबाजांना अटक
By admin | Published: April 12, 2016 02:56 AM2016-04-12T02:56:26+5:302016-04-12T02:56:26+5:30
राज्य राखीव दलाची शाखा असलेल्या भारत बटालियनमध्ये जवान भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी सकाळी सातारा
औरंगाबाद : राज्य राखीव दलाची शाखा असलेल्या भारत बटालियनमध्ये जवान भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी सकाळी सातारा परिसरातील परीक्षा केंद्रावर दोघांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे कॉपीसाठी त्यांनी अत्यंत हायटेक पद्धती वापरली होती. तसेच याच केंद्रावर भावाच्या नावे परीक्षा देणाऱ्या ‘डमी’ही अटक करण्यात आली आहे.
मदन कपूरचंद गुसिंगे (२२, रा. जालना), विजयसिंग रतनसिंग जारवाल (२४, रा. पैठण) व जीवन गोविंद जरावंडे (१९, रा. अंबड) अशी कॉपीबाजांची नावे आहेत. भारत बटालियनमध्ये जवानाच्या ४४ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या ८६९ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी सोमवारी बोलाविण्यात आले होते. या वेळी जारवाल आणि गुसिंगे यांनी बनियनच्या शिलाईमधून मायक्रोफोनची वायरिंग करून मोबाइलच्या आधारे कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा प्रकार पर्यपेक्षकांच्या लक्षात आला. त्यानंतर अधिक तपासणी केली असता, जीवन जरावंडे हा भाऊ पवनच्या नावे परीक्षा देत असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यालाही अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)