"दोनशे पीएच.डी. हाेल्डर माझ्याकडे कामाला; मी अंगठाबहाद्दर मंत्री वाटलो का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 10:54 AM2022-09-07T10:54:14+5:302022-09-07T11:00:52+5:30
"एकदा माझ्या वेबसाइटवर जा. मी किती संस्था, किती कारखाने चालविताे ते कळेल. माझ्याकडे कर्मचारी किती आहेत. किती क्वालिटीचे आहेत. मी काय तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटलाे का? माझ्यापुढे मीडियाने येऊ नये."
साेलापूर : हाफकीन ही एजन्सी असल्याचे मला चांगले माहीत आहे. दाेन-अडीचशे पीएच.डी. हाेल्डर माझ्याकडे कामाला आहेत. मी काय तुम्हाला अंगठाबहाद्दर मंत्री वाटलो की काय? हाफकीन या माणसाकडून औषधे घ्या, असे बाेललाे असेन, तर राजीनामा देताे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्याचे आराेग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांनी येथे दिली.
माझी शैक्षणिक पात्रता तुम्हाला माहिती आहे का? मी मेरिटमध्ये आपल्याला मिळालेले काम कुणीही काढून घेऊ शकत नाही, असे हाफकीनला वाटते. सहा-सहा महिने औषधे पुरविली जात नाहीत. याविषयी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
एकदा माझ्या वेबसाइटवर जा. मी किती संस्था, किती कारखाने चालविताे ते कळेल. माझ्याकडे कर्मचारी किती आहेत. किती क्वालिटीचे आहेत. मी काय तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटलाे का? माझ्यापुढे मीडियाने येऊ नये. माझ्या बाेलण्याचा चुकीचा अर्थ लावून दाखवत असाल, तर माझ्यापुढे येऊ नका, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.