एका व्यक्तीच्या नावे दोन ओळखपत्रे

By admin | Published: January 20, 2017 02:54 AM2017-01-20T02:54:57+5:302017-01-20T02:54:57+5:30

पनवेल तालुक्यात मतदार याद्यांचा सावळागोंधळ सुरू आहे. त्यामुळे पनवेल तहसीलदार व निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Two identities in one person's name | एका व्यक्तीच्या नावे दोन ओळखपत्रे

एका व्यक्तीच्या नावे दोन ओळखपत्रे

Next


तळोजा : पनवेल तालुक्यात मतदार याद्यांचा सावळागोंधळ सुरू आहे. त्यामुळे पनवेल तहसीलदार व निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कळंबोलीतील एका व्यक्तीला सारख्याच नावाने व सारख्याच पत्त्याने दोन वेगवेगळे नोंदणी क्र मांक असलेले ओळखपत्र निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे.
कळंबोलीत राहणाऱ्या सूरज जयदेव जाधव (२४) या युवकाच्या नावे दोन ओळखपत्र आले आहे. पनवेल परिसरातील अनेक मतदारांची नावे दोनदा वेगवेगळ्या मतदार यादीत छापण्यात आली आहेत.
सूरज जाधव यांनी राहत असलेल्या पत्त्यावर काही वर्षांपूर्वी मतदार नोंदणी केली, मात्र ओळखपत्र लवकर न आल्याने त्यांनी कळंबोली येथे शिवसेनेने लावलेल्या मतदार नोंदणी केंद्रावर पुन्हा नोंदणी केली. त्यामुळे त्यांची नावे दोन वेगवेगळ्या मतदार यादीत समाविष्ट आहेत.
सध्या पनवेल तालुक्यात निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील १८८ मतदार यादीत सद्यस्थितीला ५ लाख मतदार आहेत. मात्र यातील काहींकडे बोगस ओळखपत्र आहेत तर काहींच्या नावांचा दोनदा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज भरला असल्यास दोन मतदार यादीत नावे येण्याची चूक होऊ शकते, मात्र मतदारांनी केवळ एकाच ठिकाणी मतदान करायचे असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
पनवेल तालुक्यात निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील १८८ मतदार यादीत सद्यस्थितीला ५ लाख मतदार आहेत. मात्र यातील काहींकडे बोगस ओळखपत्र आहेत तर काहींच्या नावांचा दोनदा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे.
>मतदार यादीत दोनदा नाव येण्याचे प्रकार सहसा होत नाही. संबंधित व्यक्तीने ६ क्र मांकाचा फॉर्म भरून पुन्हा नोंदणी केली असावी. एका व्यक्तीला कितीही ओळखपत्र मिळाले तरी मतदान मात्र एकदाच करता येते.
- दीपक आकडे,
तहसीलदार, पनवेल
दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून नोंदणी केल्याने दोन मतदार यादीत नावनोंदणी होऊ शकते आणि दोन ओळखपत्र येऊ शकतात. मात्र असे असले तरी मतदान मात्र एकदाच करण्याचा अधिकार मतदाराला आहे.
- एल.पी. धोत्रे,
अधिकारी, निवडणूक आयोग

Web Title: Two identities in one person's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.