विवाहीतांच्या आत्महत्यांच्या दोन घटना
By Admin | Published: September 30, 2016 07:21 PM2016-09-30T19:21:50+5:302016-09-30T19:21:50+5:30
विवाहीतांनी आत्महत्या केल्याच्या दोन घटना पद्मावती आणि कोंढव्यातील मिठानगरमध्ये घडल्या आहेत. माहेराहून पैसे आणावेत म्हणून
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३० : विवाहीतांनी आत्महत्या केल्याच्या दोन घटना पद्मावती आणि कोंढव्यातील मिठानगरमध्ये घडल्या आहेत. माहेराहून पैसे आणावेत म्हणून होणा-या छळामुळे पद्मावतीमध्ये तर माहेराहून दागिने आणावेत याकरिता होणा-या छळास कंटाळून कोंढव्यात विवाहीतांनी आत्महत्या केल्या आहेत.
पुनम सागर खाडे (वय 22, रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती), राहिला गुलाब सैय्यद (वय 30, रा. मिठानगर, कोंढवा) अशी आत्महत्या केलेल्या विवाहीतांची नावे आहेत.खाडे हिच्या आत्महत्येप्रकरणी पती सागर महारुद्र खाडे (वय 25) याच्यासह तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राहिला हिच्या आत्महत्येप्रकरणी गुलाम सैय्यद, रशिद सैय्यद, असिफ सैय्यद यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि पुनम यांचे 24 मे 2014 रोजी लग्न झाले होते. माहेराहून पैसे आणावेत यासाठी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. त्यामुळे त्यांनी राहत्या घरी सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास गळफास घेतला.
तर राहिला आणि गुलाम यांचा 4 सप्टेंबर 2016 रोजी विवाह झाला होता. पती व अन्य आरोपींनी राहिला यांना ह्यतुझ्या घरच्यांनी लग्न साध्या पद्धतीने लावून दिले, लग्नात दागिने दिले नाहीत, तुला काम नीट येत नाहीह्ण असे वारंवार म्हणून त्रास दिला. माहेराहून दागिने आणण्याकरिता तगादा लावून टोचून बोलत शारीरिक व मानसित छळ केला. या छळाला कंटाळून त्यांनी शनिवारपुर्वी भैरोबानाल्याजवळील कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली.