एसटी दरीत कोसळून 2 ठार, 20 जखमी

By admin | Published: October 4, 2014 02:28 AM2014-10-04T02:28:42+5:302014-10-04T02:28:42+5:30

एसटी महामंडळाची हिरकणी बस सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर 20 प्रवासी जखमी झाल़े ही घटना एक्स्प्रेस वे-वर शुक्रवारी सायंकाळी घडली़

Two killed and 20 injured in ST valley collapse | एसटी दरीत कोसळून 2 ठार, 20 जखमी

एसटी दरीत कोसळून 2 ठार, 20 जखमी

Next
>लोणावळा : खंडाळ्य़ातील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील कुणोनामा पुलावरून एसटी महामंडळाची हिरकणी बस सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर 20 प्रवासी जखमी झाल़े ही घटना एक्स्प्रेस वे-वर शुक्रवारी सायंकाळी घडली़ 
बसचालक राजाराम ज्ञानोबा शिवतारे (49, रा. कळंब, जि. सातारा) आणि सुमारे चाळीस वर्षीय एका पुरुष प्रवासाचा (नाव समजलेले नाही) अपघातात जागीच मृत्यू झाला. सचिन भोसले (28), त्यांची पत्नी पूजा भोसले (25) आणि मुलगा ( वय 3, सर्व रा. डोंबिवली), हनुमंत पवार  (6क्, रा. सातारा), नंदा प्रमोद कांबळे (35, रा. घाटकोपर, मुंबई), अवधूत ननदीकर (26, रा. अंधेरी, मुंबई), दीपक वंजारी (42, रा. सातारा), प्रल्हाद मारुती कु:हाडे (32), प्रकाश शिंदे (24, रा. सांगली) अशी जखमींची नावे आहेत. 
निगडीतील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींमधील पाच जणांची प्रकृती गंभीर असून उर्वरित किरकोळ जखमी आहेत़ जखमींवर अद्ययावत रुग्णवाहिकांमध्ये घटनास्थळीच उपचार करण्यात आल़े 
सिंधुदुर्ग आगाराची एशियाड बस साता:याहून मुंबईच्या दिशेने जात असताना लोणावळा येथील कुणोनामा परिसरात नियंत्रण सुटल्याने लोखंडी कठडे तोडत सुमारे 1क्क् फूट खोल दरीत कोसळली़ 
दुर्घटनेच्या वेळी परिसरात हलका पाऊस सुरू होता. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य पथके, लोणावळा शहर व ग्रामीण, खंडाळा टॅब 
तसेच मावळातील सर्व पोलीस स्थानकातील कर्मचारी व अधिकारी , आयआरबी व डेल्टाचे कर्मचारी तसेच शासकीय, खासगी रुग्णवाहिका व कर्मचारी यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. जखमींना बसमधून बाहेर काढत निगडी येथील खासगी तसेच  पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल केल़े 
प्रचंड वाहतूक कोंडी
दोन क्रेनच्या सहाय्याने बस उचलून त्यातील प्रवासी बाहेर काढण्यात आले. काही काळ मुंबई व पुण्याकडील वाहतूकही थांबविण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Two killed and 20 injured in ST valley collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.