पूर्णेच्या पात्रात कार कोसळून दोन ठार

By admin | Published: April 10, 2015 11:43 PM2015-04-10T23:43:19+5:302015-04-10T23:43:19+5:30

सहा जखमी, एक जण बेपत्ता; नदीपात्रातील गाळात अडकल्याचा संशय.

Two killed in car collapse in Purna area | पूर्णेच्या पात्रात कार कोसळून दोन ठार

पूर्णेच्या पात्रात कार कोसळून दोन ठार

Next

खामगाव (जि. बुलडाणा): भरधाव कार पुलावरून ३0 ते ४0 फूट खोल पूर्णा नदीपात्रात कोसळल्याने दोन जण ठार, तर सहा जण किरकोळ जखमी झाले. बेपत्ता असलेली एक व्यक्ती नदीपात्रातील गाळात फसल्याचा संशय व्यक्त होत आहे. लग्नसमारंभ आटोपून ही मंडळी परत येत होती. ही घटना १0 एप्रिल रोजी नांदुरा-जळगाव जामोद दरम्यान येरळी पुलावर घडली. तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील रामराव लक्ष्मण नागे यांच्या मुलाचा विवाह समारंभ १0 एप्रिल रोजी हिंगणे बाळापूर (ता. जळगाव जामोद) येथे आयोजित करण्यात आला होता. या विवाहासाठी रामराम नागे यांचे नातेवाईक अडसूळ येथील वाघ महाराज यांची इंडिका कारने (क्रमांक एम.एच.३0 पी ३८३९) गेले होते. विवाह लागल्यानंतर दुपारी २ च्या सुमारास याच कारने अविनाश धनराज तायडे (४0), गजानन रघुनाथ तायडे (३५), श्रीराम सूर्यभान तायडे (४३), अंबादास भाऊराव तायडे (४२), रमेश नारायण तायडे (३५), ओमप्रकाश पांडुरंग घावट (४0) सर्व रा.कारंजा रमझानपूर (ता. बाळापूर) तसेच नागेश समाधान नागे (३२ रा.अडसूळ) असे सात जण परत अडसूळ येथे जात होते. येरळीनजीक असलेल्या पूर्णा नदीवरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलावरील कठडे तोडून ३0 ते ४0 फूट खोल असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात कोसळली. रमेश नारायण नागे व ओमप्रकाश पांडूरंग घावट हे दोघे नदीपात्रात बेपत्ता झाले. त्यापैकी घावट यांचा मृतदेह तीन तासानंतर आढळला. जखमी अंबादास भाऊराव तायडे यांचा खामगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी वाटेतच मृत्यू झाला. अपघातात अविनाश धनराज तायडे, श्रीराम सूर्यभान तायडे, नागेश समाधान नागे हे किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी वर्‍हाडींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. जखमींना नदीपात्रातून बाहेर काढून उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Two killed in car collapse in Purna area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.