जिलेटीनच्या स्फोटात नाशिकमध्ये दोन मजूर ठार

By admin | Published: April 28, 2016 01:10 AM2016-04-28T01:10:34+5:302016-04-28T01:10:34+5:30

विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटीनचा स्फोट होऊन दोन मजूर जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी येवला तालुक्यातील नायगव्हाण येथे घडली.

Two laborers killed in Nashik bomb blast in Nashik | जिलेटीनच्या स्फोटात नाशिकमध्ये दोन मजूर ठार

जिलेटीनच्या स्फोटात नाशिकमध्ये दोन मजूर ठार

Next

नाशिक : विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटीनचा स्फोट होऊन दोन मजूर जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी येवला तालुक्यातील नायगव्हाण येथे घडली.
नायगव्हाण येथील साहेबराव बकाजी शिंदे यांच्या विहिरीचे खोदकाम राजस्थानी मजुरांकडून सुरू होते. दगड फोडण्यासाठी जिलेटीन भरत असताना अचानक स्फोट झाला. त्यात पाचू नंदाजी गुर्जर (४५) व महादू भिल (२५) यांच्या शरीराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. दुर्घटनेनंतर गुर्जर यांचा मुलगा पारसमल याने घटनास्थळी धाव घेतली. मात्र गुर्जर व भिल यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी ठेकेदार देवीलाल गुर्जर (रा. भिलवाडा, राजस्थान) यास ताब्यात घेतले आहे. येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)

Web Title: Two laborers killed in Nashik bomb blast in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.