नवागाव येथे दोन लाखांची चोरी
By admin | Published: November 18, 2015 01:06 AM2015-11-18T01:06:06+5:302015-11-18T01:06:06+5:30
साक्री तालुक्यातील नवागाव येथे बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरटय़ांनी घरातून 2 लाख 56 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली.
कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या आमदार महादेवराव महाडिक, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईतील गांधी भवनमध्ये स्वतंत्र मुलाखती घेतल्या.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या समर्थकांच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन आवाडे यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला. या मुलाखतीवर आधारित संक्षिप्त अहवाल आपण पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना पाठविणार असून, पक्षाच्या केंद्रीय समितीकडून दिल्लीतूनच उमेदवारी जाहीर होईल. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला इतरांनी पाठबळ देऊन ही जागा निवडून आणावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी केले.
या जागेचे महादेवराव महाडिक हे विद्यमान आमदार आहेत; परंतु महापालिका निवडणुकीत त्यांचा मुलगा स्वरूप यांनी थेट काँग्रेसविरोधात ताराराणी आघाडी रिंगणात आणली होती. दुसरा मुलगा आमदार अमल महाडिक हे भाजपचे असल्याने तेदेखील विरोधात होते. त्यामुळे महाडिक यांच्या उमेदवारीस सतेज पाटील यांनी विरोध केला आहे. ही उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केल्यावर या उमेदवारीचे दावेदार वाढले.
त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी मंगळवारी सगळ्यांनाच बोलावून त्यांच्या मुलाखती घेतल्या.
प्रकाश आवाडे हे विदेशात असल्याने त्यांच्या उमेदवारीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवक बाळासाहेब कलागते, रवी रजपूत, जिल्हा बँकेचे संचालक विलास गाताडे, पैलवान अमृता भोसले, शामराव कुलकर्णी आणि अहमद मुजावर यांचे शिष्टमंडळ भेटले. आवाडे हे चारवेळा आमदार होते. त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. आता इचलकरंजीची नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्याशिवाय शिरोळ-हातकणंगले तालुक्यांत आवाडेंना मानणारा वर्ग आहे. त्यांच्या पक्षनिष्ठेचा विचार करून त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. तसे लेखी निवेदनही त्यांनी चव्हाण यांना दिले.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्याशीही चव्हाण यांनी चर्चा केली. कुणाला उमेदवारी दिली तर काय होऊ शकते यासंबंधीचा कानोसा या चर्चेतून चव्हाण यांनी घेतला. परंतू आपण कुणाला उमेदवारी द्या अथवा कुणाला नको असे सांगितले नसल्याचे आवळे यांनी स्पष्ट केले.
मुलाखतीपूर्वी चव्हाण यांच्या उपस्थितीत पी. एन. पाटील, सतेज पाटील, आमदार महाडिक, जयवंतराव आवळे, सुरेश कुराडे, सुनील सलगर, प्रल्हाद चव्हाण, पक्षनिरीक्षक रमेश बागवे व सत्यजित देशमुख यांची एकत्रित बैठक झाली. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर झाल्याबद्दल सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा सत्कार केला.
२५ नोव्हेंबर दरम्यान निर्णय
विधान परिषदेच्या कोल्हापूरसह राज्यातील आठ जागांची मुदत १ जानेवारी २०१६ रोजी संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी ही निवडणूक व्हायला हवी. त्या हिशेबाने उमेदवारीचा निर्णय व निवडणूकही २५ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
सतेज यांच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळ मुंबईला
कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेची उमेदवारी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनाच दिली जावी, अशी मागणी करण्यासाठी नूतन महापौर अश्विनी रामाणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील दहा-बारा नगरसेवकांचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबईला रवाना झाले.
आज, बुधवारी सकाळी अकरा वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ते भेट घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला २७ जागा मिळाल्या आहेत. सतेज पाटील यांच्याच प्रयत्नांमुळे भाजप व ताराराणी आघाडीचा विरोध असतानाही काँग्रेसचा महापौर होऊ शकला. त्यामुळे त्यांनाच ही उमेदवारी दिली जावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे करणार असल्याचे महापौर रामाणे यांनी सांगितले.
शिष्टमंडळात शारंगधर देशमुख, संजय मोहिते, प्रताप जाधव, वृषाली कदम, रिना कांबळे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, आदींचा समावेश आहे.
आवाडे समर्थकांची स्वतंत्र भेट
मी, पी. एन. व आवाडे एकत्र आहे असे महाडिक सांगत असले, तरी आवाडे समर्थकांनी प्रदेशाध्यक्षांची स्वतंत्र भेट घेऊन उमेदवारीचा आग्रह धरला. ही उमेदवारी आवाडे यांना मिळावी एवढाच आमचा आग्रह असून, पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असे शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्पष्ट केले.
सत्यजित कदम यांना बाहेर घालविले
मुलाखतीपूर्वी जी बैठक झाली तिला ताराराणी आघाडीचे नगरसेवक सत्यजित कदम स्वत:हून उपस्थित होते. त्याला सतेज पाटील यांनी आक्षेप घेतला. काँग्रेसच्या बैठकीस भाजपचा नगरसेवक कसा काय उपस्थित आहे, अशी विचारणा त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली. त्यावर कदम यांनी मी ताराराणी आघाडीचा नगरसेवक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी ‘मी काही तुम्हाला बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याने तुम्ही बाहेर जावे,’ असे त्यांना सांगितले. त्यानंतर कदम बैठकीतून बाहेर गेले.
जिल्हा परिषदेत सत्ता येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. करवीर व गगनबावडा पंचायत समितीतही सत्ता आहे. कोल्हापूर महापालिकेत तगडे आव्हान परतवून पुन्हा काँग्रेसचा महापौर केला आहे. पक्षाचा विचार मानून काम करीत आहे. त्यामुळे मला उमेदवारी मिळावी. - सतेज पाटील
आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडली आहे. काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलो आहे. जिल्हाध्यक्ष म्हणूनही सक्षमपणे काम केले आहे. त्याचा विचार करून मला उमेदवारी दिली जावी. - पी. एन. पाटील
मी, पी. एन. किंवा आवाडे यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी. महापालिका निवडणुकीत मी काँग्रेसविरुद्ध भूमिका घेतलेली नाही. उमेदवारी देताना एकतर्फी निर्णय होऊ नये.
- आमदार महादेवराव महाडिक