दोन कोटी वृक्ष लागवड योजनेतील झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर!
By admin | Published: May 3, 2017 02:11 AM2017-05-03T02:11:57+5:302017-05-03T02:11:57+5:30
वाशिम : गतवर्षी जुलै महिन्यात २ कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. त्याअंतर्गत २ लाखांपेक्षा अधिक झाडांची लागवडही करण्यात आली. मात्र, ही झाडे सध्या पाण्याअभावी सुकत आहेत.
वाशिम : गतवर्षी जुलै महिन्यात २ कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. त्याअंतर्गत २ लाखांपेक्षा अधिक झाडांची लागवडही करण्यात आली. मात्र, ही झाडे सध्या पाण्याअभावी सुकत आहेत.
गतवर्षी १ जुलै २०१७ रोजी ‘एकच लक्ष्य-दोन कोटी वृक्ष’, या अभिनव उपक्रमांतर्गत सामाजिक वनिकरण विभागाने जिल्ह्यातील विविध गाव शिवारात हजारो वृक्ष लागवड केली होती. कृषी विभागाने ३९ हजार २००, महसूल विभाग ३१०, सहकार व पणन ५००, जिल्हा आरोग्य अधिकारी १३००, जिल्हा शल्य चिकित्सक ३५०, विधी व न्याय विभाग ३७२, लेखा व कोषागार अधिकारी कार्यालय ७५, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा १४००, सार्वजनिक बांधकाम विभाग ७००, उच्च व तंत्रशिक्षण विभाग ७०, गृहविभाग २३५०, शिक्षण विभाग १७ हजार ५८५, माध्यमिक शिक्षण विभाग ४५४०, विद्यूत वितरण कंपनी ९४०, समाजकल्याण २०४०, रिसोड गटविकास अधिकारी ७२००, वाशिम गटविकास अधिकारी ६१००, मंगरूळपीर गटविकास अधिकारी ६६८४, मालेगाव गटविकास अधिकारी ८३७७, मानोरा गटविकास अधिकारी ७७००, कारंजा गटविकास अधिकारी २६०५ यासह एकंदरित ४२ प्रशासकीय कार्यालयांमध्ये वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. ही वृक्षलागवड काही प्रमाणात यशस्वीही झाल्याचे चित्र होते. परंतु आता मात्र पाण्याअभावी ही वृक्षलागवड धोक्यात आली आहे.