झेंडूने दिले दोन महिन्यांत १३ लाख

By admin | Published: September 9, 2016 01:42 AM2016-09-09T01:42:41+5:302016-09-09T01:42:41+5:30

रत्नपुरी येथील महाराष्ट्र राज्य शेतीमहामंडळाच्या करार पद्धतीने घेण्यात आलेल्या ४० एकरांत डाळिंबाच्या आंतरपिकात झेंडूचे विक्रमी उत्पादनात भर घालून दोन महिन्यांत १३

In the two months of the maratha, 13 lakhs | झेंडूने दिले दोन महिन्यांत १३ लाख

झेंडूने दिले दोन महिन्यांत १३ लाख

Next

सुरेश निडबणे,  वालचंदनगर
रत्नपुरी येथील महाराष्ट्र राज्य शेतीमहामंडळाच्या करार पद्धतीने घेण्यात आलेल्या ४० एकरांत डाळिंबाच्या आंतरपिकात झेंडूचे विक्रमी उत्पादनात भर घालून दोन महिन्यांत १३ लाखांचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांपुढे आदर्श दिलेला आहे. अंतर पिकात झेंडूच्या उत्पादनाचा प्रयोग करण्यात यश प्राप्त झालेले आहे. बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतीमहामंडळाच्या कराराने घेण्यात आलेल्या झेंडूने भाव खाल्ला आहे.
रत्नपुरी येथील महाराष्ट्र राज्य शेतीमहामंडळातील पाचशे एकर जमीन अमोल पोरवाल यांनी करार पद्धतीने घेतली आहे. या जमिनीवर ४० एकरांत डाळिंब लावण्याचा निर्णय घेतला. पाचशे एकरांत अंडर ग्राउंड ड्रीप केले आहे. योग्य अंतरावर डाळिंबाची लागवड केली आहे. डाळिंबाचा खर्च काढण्यासाठी झेंडूची निवड करण्यात आली. नर्सरीतून रोप खरेदी करण्यात आले. डाळिंबाच्या मधोमध झेंडू लागवड करण्यात आलेली आहे. डाळिंबाच्या औषधांची फवारणी झेंडूला एकाच वेळी देण्यात आल्याने डाळिंब व झेंडू यांची भरगच्च वाढ झालेली आहे. त्यामुळे दररोज तीनशे कॅरेट झेंडूच्या फुलांची तोड होते. एका कॅरेटमध्ये १० किलो झेंडू सामावले जाते.

Web Title: In the two months of the maratha, 13 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.