लेप्टोचे आणखी २ बळी
By admin | Published: July 10, 2015 03:43 AM2015-07-10T03:43:21+5:302015-07-10T03:43:21+5:30
लेप्टामुळे आणखी दोन मुंबईकरांचा बळी गेला आहे. जुलै महिन्याच्या ९ दिवसांत १४ जणांचा मृत्यू लेप्टोमुळे झाला असून, ३६ रुग्ण आढळून आल्याची
मुंबई : लेप्टामुळे आणखी दोन मुंबईकरांचा बळी गेला आहे. जुलै महिन्याच्या ९ दिवसांत १४ जणांचा मृत्यू लेप्टोमुळे झाला असून, ३६ रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली आहे.
मालाड येथे राहणाऱ्या ३८वर्षीय पुरुषाचा ६ जुलै रोजी लेप्टोमुळे मृत्यू झाला. ५ जुलैला त्याला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, रे रोड येथील ४०वर्षीय पुरुषाचा ८ जुलै रोजी मृत्यू झाला आहे. पण, या पुरुषास लेप्टो आणि मलेरिया असे दोन्ही आजार झाले होते. लेप्टोचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायूदुखी अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे साथरोग नियंत्रण कक्षप्रमुख डॉ. मिनी खेत्रपाल यांनी सांगितले.