फोटो काढायला सांगून रायगडच्या टकमक टोकावरुन दोन जणांनी मारली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 06:47 PM2017-08-26T18:47:58+5:302017-08-26T18:48:06+5:30

फोटो काढायला सांगून रायगडच्या टकमक टोकावरुन दोन जणांनी उडी मारल्याची घटना घडली आहे.

Two people rushed to the spot and asked to take a photo of Raigad | फोटो काढायला सांगून रायगडच्या टकमक टोकावरुन दोन जणांनी मारली उडी

फोटो काढायला सांगून रायगडच्या टकमक टोकावरुन दोन जणांनी मारली उडी

Next
ठळक मुद्देफोटो काढायला सांगून रायगडच्या टकमक टोकावरुन दोन जणांनी उडी मारल्याची घटना घडली आहे.

जयंत धुळप
महाड, दि. 26- फोटो काढायला सांगून रायगडच्या टकमक टोकावरुन दोन जणांनी उडी मारल्याची घटना घडली आहे. महाड तालुक्यातील कुंभारडे गावांतील लता राम मुकणे(15) आणि माणगांव तालुक्यांतील कासेवाडी येथील तरुण सोनू (पूर्ण नाव उपलब्ध नाही) हे दोघे शनिवारी दुपारी 2.15 वाजता रायगड किल्ल्याच्या टकमक टोकरुन खाली दरीत पडून हरवले असल्याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मारुती पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. पोलीस निरिक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शोध पथकाकडून त्या दोघांचा शोध घेतला जातो आहे. रायगडमध्ये मुसळधार पाऊस असल्याने शोध पथकाच्या कामात व्यत्यय येत असल्याची माहिती मिळते आहे. 

लता राम मुकणे, तीचा चुलत भाऊ राहुल सुरेश मुकणे (17) आणि लताचा  परिचित मित्र सोनू असे तिघे रायगड किल्ल्यावर गेले होते. टकमक टोकाजवळ गेल्यावर लता राम मुकणे आणि सोनू या दोघांनी त्या दोघांचा फोटो काढण्यास आपल्याला सांगितले. मी फोटो काढत असतानाच ते मला बाय बाय राहूल असे म्हणाले आणि टकमक टोकावरुन खाली दरीत पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी लता राम मुकणे हिचा चुलत भाऊ राहुल सुरेश मुकणे याने पोलिसांना दिली आहे.

दरम्यान लता राम मुकणे आणि सोनू हे दोघे टकमक टोकावरुन खाली दरीत पडतानाचा फोटो राहुल सुरेश मुकणे यांच्याकडून पोलीसांना प्राप्त झाला आहे. हा अपघात आहे वा अन्य काही या बाबतची स्पष्टता तपासाअंतीच हाोवू शकेल असे महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मारुती पाटील यांनी अखेरीस सांगितले.

Web Title: Two people rushed to the spot and asked to take a photo of Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.