हिंगोलीमध्ये वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू, 5 जखमी

By Admin | Published: June 6, 2017 08:02 AM2017-06-06T08:02:19+5:302017-06-06T08:05:30+5:30

मराठवाड्यामध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा कहर सुरू आहे. शहर आणि परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.

Two people were killed and five others injured in lightning in Hingoli | हिंगोलीमध्ये वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू, 5 जखमी

हिंगोलीमध्ये वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू, 5 जखमी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 6 - मराठवाड्यामध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा कहर सुरू आहे. शहर आणि परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक भागातील वीज गायब झाली आहे. 
 
तर सेनगावातील जामरुन आंधमध्ये वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल आहे तर दोन जण जखमी झाले आहेत.  दुसरीकडे, भोसीमध्ये वीज पडून तिन जण जखमी झाले आहेत. 
 
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भमध्ये गेल्या काही दिवसांत पावसानं हजेरी लावली असली तरी राज्यातील काही भागांमध्ये म्हणावं त्याप्रमाणे पावसाला सुरुवात झालेली नाही. यामुळे उकाड्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे.
 
(महाराष्ट्रात ७ जूननंतर मान्सूनधारा!)
 
केरळात नेहमीपेक्षा एक दिवस अगोदरच (३० मे) आलेला मान्सून पश्चिमेकडील शुष्क वाऱ्याच्या दबावामुळे तिथेच थबकला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अजून ३ ते ४ दिवस तरी मान्सून राज्यात येण्याची शक्यता नाही, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
 
मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर तो पुढील वाटचाल वेगाने करेल, अशी शक्यता हवामान विभागाने यापूर्वी व्यक्त केली होती़ त्याच दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात मोरा चक्रीवादळ निर्माण झाले़ यामुळे सर्व बाष्प इशान्यकडे खेचले गेल्याने, मान्सूनच्या पश्चिम शाखेची पुढील वाटचाल रोखली गेली आहे़
 
ईशान्य शाखेने बांगला देश, म्यानमार व ईशान्यकडील राज्यात धडक मारली होती़ मात्र, २ जूननंतर तेथील वाटचालदेखील थांबलेली आहे़
 
सर्वसाधारणपणे मान्सून ५ जूनपर्यंत कर्नाटकाची किनारपट्टी, कारवार, गदग, हैदराबाद, विशाखापट्टम, पश्चिम बंगालचा उपसागर, बांगला देशातील ढाक्कापर्यंत मजल मारत असतो़, पण यंदा लवकर येऊनही त्याची प्रगती केरळच्या काही भागापर्यंतच झालेली आहे़
 
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, तरी त्याच्या पुढील प्रगतीसाठी आवश्यक असे हवामानात बदल घडून आले नाहीत़ सौदी अरेबिया व त्या परिसरातील वाळवंटी भागातून येणाऱ्या शुष्क वाऱ्यांचा दबाव जास्त आहे़ संपूर्ण उत्तर भारत अशा वाऱ्यांनी व्यापला आहे़ आकाशात ढग आहेत, पण या वाऱ्यांमुळे त्यात वाढ होऊन पाऊस पडू शकत नाही़
 
यामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे़ पश्चिम भागात चक्राकार गती निर्माण झाली असली, तरी वाळवंटी प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर जास्त असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे़
 
पाऊस उशिरा सुरू होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत़ पक्षी-प्राणीही गरमीने त्रस्त झाले आहेत़
 
पावसाचा दिलासा
 
गेल्या चार दिवसांत राज्यात पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे़ कोकणात ३६ टक्के, मध्य महाराष्ट्रात २२, विदर्भात ९ आणि मराठवाड्यात ४४ टक्के जादा पाऊस झाला आहे़
 
>मान्सूनची प्रगती थांबल्याचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडूवर झाला असून, गेल्या १ ते ४ जून दरम्यान तामिळनाडूत सरासरीपेक्षा ५४ टक्के पाऊस कमी झाला आहे़ दक्षिण कर्नाटकात ५६ टक्के कमी पाऊस झाला असून, रायलसीमा ४१ टक्के आणि कर्नाटक अंतर्गत भागात ३३ टक्के कमी पाऊस झाला आहे़ कर्नाटकच्या किनारपट्टीवर सरासरी एवढा पाऊस झाला आहे़
 
१ ते ४ जून दरम्यान राज्यातील पाऊस (मिमी)
 
विभाग           सरासरी पाऊस  प्रत्यक्षात पडलेलाटक्केवारी
 
कोकण    २९.५४०३६
 
मध्य महाराष्ट्र   ९.७११.८२२
 
मराठवाडा         ९.५१३.६४४
 
विदर्भ   ६.२६.८
 

Web Title: Two people were killed and five others injured in lightning in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.