कल्याणमध्ये महिला पोलिसांनाच मारहाण, दोन फेरीवाले अटकेत
By Admin | Published: August 27, 2016 06:40 PM2016-08-27T18:40:49+5:302016-08-27T18:40:49+5:30
पश्चिम रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना शिवागाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला
>- ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 27 - पश्चिम रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना शिवागाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला.या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी दुर्गा तिवारी आणि सुभम मिश्रा या दोघांना अटक केली आहे.कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन्ही आरोपींना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता,त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर व रेल्वे पादचारी पुलावर राजरोसपणे फेरीवाले ठाण मांडून बसलेले असतात.या विरोधात नेहमी रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी थातूरमातूर कारवाई करून फेरीवाल्यांना सोडून देत होते.त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना चालणेही कठीण झाले होते.याबाबतची सविस्तर बातमी लोकमतने छापून वाचा फोडून स्थानिक व रेल्वे पोलीस फेवाल्यांकडून हप्ते वसुली करून कशी लुट करतात हे जनते समोर मांडले होते .त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच पंचायत होऊन बदनामी झाली.अखेर वरिष्ठांकडून रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांना चांगलीच झापण्यात आले.त्यांनतर रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी दोन दिवसांपासून धडक कारवाई मोहीम सुरु केली.रात्री ही कल्याण पश्चिमेतील रेल्वे हद्दीत धंदा करणाऱ्या महिला फेरीवाल्यांचा माल रेल्वे महिला सुरक्षा बलाच्या विशेष स्कॉर्डच्या पथकाने उचलून पोलीस ठाण्यात आणला.त्यामुळे चिडलेल्या फेरीवाल्या महिला आणि त्यांच्या अन्य पुरुष सहकाऱ्यांनी याचा जाब विचारण्यासाठी कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस ठाणे गाठले.तेथे असलेल्या रेल्वे महिला सुरक्षा बलाच्या विशेष स्कॉर्ड मधील 2 कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून अंगावर दुर्गा तिवारी, शुभम मिश्रा,दिनेश आणि अन्य 2 जण धावून गेले.तसेच त्यांच्या हात फिळून त्यांना मारहाण ही करण्यात आले.हा सराव प्रकार पोलीस ठाण्याच्या आवरत घडल्याने एकच खळबळ उडाली.अखेर अन्य रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी त्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून येवून दुर्गा आणि शुभम यांना अटक केली.मात्र दिनेश व अन्य साथीदार तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवरच अशा प्रकारे हल्ले होते असल्याने नागरिकांनी व प्रवाशांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
दोन महिन्यांपासून कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख पद रिकामे
कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश कांबळे यांची बदली होऊन दोन महिने झाले तरी तेथे अद्याप कोणी प्रमुख अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली नाही.कल्याणचा प्रभारी कार्यभार डोंबिवलीचे आर के मिश्रा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन असतानाही तेथील रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक हे पद दोन महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे असल्याने फेरीवाल्यांची हिंम्मत पोलीस ठाण्यात घुसून महिला कर्मचाऱ्यांना मारण्यात पर्यंत गेल्याची चर्चा पोलीस वर्गात चर्चिला जात होती.त्यामुळे या घटनेनंतर तरी कायमस्वरूपी वरिष्ठ निरीक्षक पद भरले जाईल अशी अपेक्षा कर्मचारी करीत आहेत.