डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याचे दोन पोलीस निलंबित : जमावाने एकाला मारहाण करतांना बघ्याची भूमिका घेणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:28 AM2017-10-31T11:28:21+5:302017-10-31T11:28:21+5:30
जमावाच्या बेदम मारहाणीत अनोळखी व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी खोणी भागात घडली होती. त्या घटनेतील तीन आरोपिंना मानपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिराने अटक केली आहे. त्या घटनेत बघ्याची भूमिका घेतलेल्या मानपाडा पोलिस ठाण्याच्या दोन पोलीसांवर देखिल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
डोंबिवली: जमावाच्या बेदम मारहाणीत अनोळखी व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी खोणी भागात घडली होती. त्या घटनेतील तीन आरोपिंना मानपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिराने अटक केली आहे. त्या घटनेत बघ्याची भूमिका घेतलेल्या मानपाडा पोलिस ठाण्याच्या दोन पोलीसांवर देखिल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई एच.एम.गरड, पोलीस नाईक एस.व्ही.कचवे अशी त्या दोघांची नावे असून अज्ञात व्यक्तिला जमावाकडुन मारहाण होतांना बघ्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी, या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन काब्दुल्ले यांनी दिली. ते म्हणाले की या घटनेतील तीन आरोपिंनाही अटक सोमवारी रात्री अटक केली असून अमित पाटील, सागर पाटील, बाळाराम फरड अशी त्या तिघांची नावे आहेत. बुधवारी २५ आॅक्टोबर रोजी नेवाळी भागातून येणा-या ट्रकमध्ये मयत झालेल्या अज्ञात व्यक्तिचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी ट्रक थांबल्यावर त्याने एका दुकानातून खराटा घेतला. त्याला दुकानदाराने विरोध केला, त्यावर त्याने दुकानदारालाही खराट्याने मारहाण केली. त्या घटनेतच जमलेल्यांनी त्याला बेदम मारहाण केली. तेव्हा टेम्पो गाठत त्या तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला.त्या टेम्पोची दुस-या टेम्पोला धडक बसल्याने त्या घटनेतही त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात तो इतरांना मारत सुटल्याने जमावाने त्यास मारहाण केली. त्या मारहाणीत रक्तस्त्राव झाल्याने त्याला उपचारादम्यान नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना तपासादरम्यान मयत झालेल्या व्यक्तिकडे एक चिठ्ठी सापडली. त्यावरुन तो मानसिक आजारावर उपचार घेत असल्याचे समजले, तो युपीचा राहणारा होता असेही तपासात आढळले आहे. त्यासाठी एक पथक युपीला गेले असल्याची माहिती काब्दुल्ले यांनी ‘लोकमत’ला दिली.