" दोन स्पेशल " आणि " Brexit " चुकलेला अंदाज

By admin | Published: July 21, 2016 01:21 PM2016-07-21T13:21:54+5:302016-07-21T13:42:33+5:30

क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित " दोन स्पेशल " हे नाटक सध्या मराठी रंगभूमी वर गाजत आहे . कमीतकमी ५ - ६ वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहेत.

The "two special" and "Brexit" misses estimates | " दोन स्पेशल " आणि " Brexit " चुकलेला अंदाज

" दोन स्पेशल " आणि " Brexit " चुकलेला अंदाज

Next

- चन्द्रशेखर टिळक 

क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित " दोन स्पेशल " हे नाटक सध्या मराठी रंगभूमी वर गाजत आहे .  कमीतकमी ५ - ६ वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहेत. परत - परत जाऊन पाहावे अशी नाटकं मराठी रंगभूमीवर अभावानेच आजकाल येतात . त्यामुळे तर या नाटकाचे विशेष महत्व आहे . गिरीजा ओक - गोडबोले आणि जितेंद्र जोशी यांचा अप्रतिम  अभिनय , ह . मो . मराठे यांची तशी जुनी पण प्रभावी कथा , क्षितिज पटवर्धन यांचे तुफान लेखन असा हा संगम आहे . हे नाटक पाहायला मी एक मराठी नाट्यवेडा म्हणूनच गेलो होतो . परत परत ही नक्कीच जाईन. पण आज Brexit  चा विचार करत असताना मला राहून राहून हे नाटक आठवत आहे . कारण या दोन गोष्टीत कमालीचे साम्य आहे . 
 
" दोन स्पेशल " हे नाटक नवीन असले तरी ते ज्या कथेवर आधारित आहे ती ह . मो . मराठे यांची कथा तशी जुनीच आहे . अगदी तसेच इंग्लेंडने जरी युरोपियन यूनियन मधून बाहेर पडण्याचा निर्णय ( म्हणजेच Brexit ) घेणे हा निर्णय जरी नवा म्हणजे २३ जून २०१६ च्या सार्वमतातून ठरला असला तरी इंग्लेंडने युरोपियन यूनियन मधून बाहेर पडण्याच्या चर्चेची कथा तशी जुनीच आहे . 
 
Brexit ही राजकीय - आर्थिक घटना आणि " दोन स्पेशल " हे मराठी नाटक  या दोन घटकातले दूसरे साम्य म्हणजे हा निर्णय पुरूषी राजवटीत झाला असला तरी त्याला महिला वर्चस्वाची भक्कम पार्श्वभूमी आहे . नाटकाची आणि कथेची नायिका जशी वेळेवर भेटत नाही , न सांगता निघून जाते अशा नायकाच्या भावावस्थेतून जसे हे नाटक घडते ; अगदी तसेच ब्रिटनने युरोपियन यूनियन मधे सहभागी होण्यास सुरुवातीच्या काळात मार्गारेट थँचर यांच्या पंतप्रधान पदांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत विरोध झाला होता . त्यातूनच ब्रिटन युरोपियन यूनियन मधे  सहभागी झाला तरी त्यांचे पौंड - sterling हे चलन स्वतंत्र राहील अशी तडजोड झाली.  
 
स्वाभिमानी जर्मनी आणि त्यांच्या पोलादी पंतप्रधान अन्जेला मार्केल यांना हे मनोमन मान्य असणे कठीणच होते . त्यामुळेच तर सार्वमतानुसार विभक्त होण्याचा निर्णय अंमलात आणण्याचे इंग्लेंडने ठरवले तरी त्यासाठी त्यांना दोन वर्षांची मुदत आहे . पण तेवढा वेळ इंग्लेंडने घेऊ नये अशीच जर्मनीची भूमिका आहे . असे सार्वमत घेण्याची घोषणा इंग्लेंडचे आता भूतपूर्व पंतप्रधान डेविड कॅमरॉन या पुरूष पंतप्रधानांचा . सार्वमत घेतलेही गेले त्यांच्याच कारकिर्दीत . पण त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मात्र आली आहे ब्रिटनच्या नवीन " महिला " पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर .
 
Brexit ही जागतिक अर्थकारण - राजकारणातील महत्वाची घटना आणि " दोन स्पेशल " हे मराठी नाटक यांच्यातील तिसरे साम्य म्हणजे आपल्या आजबाजूच्या माणसांचा न आलेला अंदाज . नाटकाच्या नायिकेला आपल्या बहिणीच्या मनोवृत्तीचा , सिनेमात जाण्याच्या झपाटलेलपणाचा नेमका अंदाज येत नाही . त्यामुळे स्वतःच्या वडिलांना अंधारात ठेवत ती बहिणीच्या घर सोडून पळून जाण्याच्या निर्णयाला साथ देते . पण नाटकाच्या नायिकेचा हा अंदाज चुकतो आणि बहिणीच्या आयुष्याची वाताहत होते .  Brexit बाबत सार्वमत घेण्याची घोषणा आधी  करतांना आणि नंतर ती अंमलात आणताना डेविड कॅमरोन यांचाही अंदाज असाच चुकला . सार्वमत सरकारच्या विरुद्ध जाईल असं त्यांनाच काय , कदाचित ( कदाचित इतका मराठीत दुसरा धोकादायक शब्द कदाचित मराठीत नसावा ) Brexit च्या समर्थकांनाही वाटले नसावे . 
 
या दोन गोश्तितील चौथे साम्य म्हणजे निर्णय घेतला कोणी आणि भोगावे लागले कोणाला ?  तसेच घटनेनंतर मालकी कोणाकडे गेली ? घर सोडून पळून जाण्याचा निर्णय कथा आणि नाटकाच्या नायिकेच्या बहिणीचा . भोगावे लागले नायिकेला आणि मालकी गेली नायिकेच्या नवऱ्याकडे आणि नोकरी देणाऱ्याकडे .  यात बिचाऱ्या नाटकाच्या नायकाचे काय ? Brexit  मधेही झाले आहे तसेच . सार्वमताचा निर्णय डेविड कमेरोन यांचा . सार्वमत जिंकले नायजेल फराज ने . तो निर्णय अंमलात आणण्याआधीच या दोघांनीही राजिनामे दिले आहेत . त्यामुळे आता जबाबदारी नवीन पंतप्रधान थेरेसा मे यांची . भोगायचे सर्वसामान्य जनतेनी . इंग्लेंड मधल्याही आणि युरोप मधल्याही .
 
या दोन गोष्टीतले पाचवे साम्य याच नाटकातील एका संवादात सांगितले आहे . " सवयी आणि परिस्थिती या दोन वेगळ्या गोष्टी असतात . "  Brexit च्या निर्णय जेंव्हा खरंच अंमलात येईल तेंव्हा इंग्लेंड आणि इतर यूरोपीय जनतेला यांचा नक्कीच अनुभव येईल . कारण थोडी - थोडकी  नव्हे तर तब्बल ४३ वर्षे इंग्लेंड युरोपियन यूनियन चा सभासद आहे .  चलनाचे विलिनीकरण झाले नसले तरी व्यक्ति - माल - वस्तू यांची अनिर्बंध देवाण - घेवाण विनासायास सुरू होती .  इंग्लीश विद्यापीठात प्रवेश ते नोकरी अशा अनेक बाबतीतील आजपर्यंतच्या सवयी आता परिस्थिती नुसार सगळ्यांनाच बदलाव्या लागतील . 
 
Brexit आणि " दोन स्पेशल " यातले सहावे साम्यही असंच याच नाटकातील अजून एका वाक्याने सांगता येईल .  नाटकात तिच्या ऑफीसचे एक काम करून घेण्यासाठी नायकाच्या ऑफीस मधे येते . तिथे अचानक अनेक वर्षानंतर नायक - नायिका एकमेकांच्या आमनेसामने येतात . तत्वनिश्थ नायक असले काम करणार नाही याचा नायिकेला पूर्ण अंदाज येतो . पण परिस्थिती मुळे तिचाही नाईलाज असतो . तेंव्हा ती नायकाला सांगते की " तुलाही compromise करायला लागू नाही आणि मलाही manage करायला लागू नाही असं काहीतरी व्हायला हवे . "  जागतिक अर्थकारण आणि राजकारण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे घडते आणि ज्या तर्हेने सर्वसामान्यांना सांगितले जाते , त्याचं यापेक्षा जास्त समर्पक शब्दांत वर्णन करता येईल ? आहे फक्त इतकेच नाटकात तशी घटना घडते . प्रत्यक्ष आयुष्यात नाही ना होत तसं ! !
 
या दोन गोष्टीतले सातवे साम्यही याच नाटकातील अजून एका वेगळ्या विधानाने मांडता येईल . या नाटकाची नायिका एकमेकांना स्वतःचा भूतकाळ आणि वर्तमान स्पष्ट करतांना नायकाला सांगते " ज्याला भूतकाळात सोडून आले , त्याच्या हाती आपला भविष्यकाळ ठरवण्याचे आधिकार द्यायला लागावे असा कोणाचाही वर्तमानकाळ असू नाही  " .  Brexit लाही हे तंतोतंत लागू पडत नाही का ?
 
 " दोन स्पेशल " हे मराठी नाटक आणि Brexit ही जागतिक राजकारण व अर्थकारण यातली एक महत्वाची घटना यात असणारे आठवे साम्य म्हणजे या नाटकात वर्तमानपत्र ऑफीस चे नेपथ्य उभे करतांना मधोमध एक बांबूचा आधार दाखवला आहे . लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे काहीही म्हणले , त्याचा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजची या क्षेत्राची सर्वांगीण नाजूक परिस्थिती या बान्बूतून समोर येत राहाते . ब्रिटन चा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजचे त्यांचे स्थान जागतिक अर्थकारण व राजकारणात असेच तकलादू आहे का हा प्रश्न ही आहेच ना !
 
सरतेशेवटी , या वर्षी डॉ . गिरीश ओक त्यांच्या " ती फूलरानि " या नाटकातील भूमिकेसाठी , तर गिरीजा ओक - गोडबोले " दोन स्पेशल " या नाटकातील भूमिकेसाठी निश्चितच अनेक पुरस्कारान्साथि आधिकारिक आहेत . त्या पिता - पुत्रीची कामगिरी च तशीच आहे . Brexitबाबत असं म्हणता येईल का  ?
 
(लेखक अर्थतज्ज्ञ आहेत)
 
 

Web Title: The "two special" and "Brexit" misses estimates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.