पुण्यासाठी दोन विशेष रेल्वेगाड्या

By Admin | Published: November 13, 2015 12:24 AM2015-11-13T00:24:53+5:302015-11-13T00:24:53+5:30

दिवाळीच्या सुटीनंतर पुण्याला जाण्यासाठी सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल झाल्या. खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीटही तीन हजारावर पोहोचले.

Two special trains for Pune | पुण्यासाठी दोन विशेष रेल्वेगाड्या

पुण्यासाठी दोन विशेष रेल्वेगाड्या

googlenewsNext

नागपूर : दिवाळीच्या सुटीनंतर पुण्याला जाण्यासाठी सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल झाल्या. खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीटही तीन हजारावर पोहोचले. त्यामुळे प्रवाशांची प्रतीक्षायादी पाहून नागपूर-पुणे मार्गावर दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
विदर्भातून अनेक विद्यार्थी आणि नोकरदार पुण्यात शिकायला, नोकरीनिमित्त राहतात. दिवाळीच्या सुट्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ते परत येतात. परंतु या काळात पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात आरक्षण मिळत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे दरम्यान सुपरफास्ट रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२१८ नागपूर-पुणे स्पेशल रेल्वेगाडी १३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल.
रेल्वेगाडी क्रमांक ०१२१७ पुणे-नागपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस पुण्यावरून १४ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री २ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एक एसी टु टायर, ७ सेकंड क्लास स्लिपर चेअरकार, ७ जनरल सेकंड क्लास, २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०१२२३ नागपूर-पुणे एक्स्प्रेस सुपरफास्ट रेल्वेगाडी नागपूरवरून १६ नोव्हेंबरला सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल.
रेल्वेगाडी क्रमांक ०१२२४ सुपरफास्ट एक्स्प्रेस १७ नोव्हेंबरला पुण्यावरून दुपारी २.४५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ५.१५ वाजता पोहोचेल.
दोन्ही गाड्यात एक एसी टु टायर, एक एसी थ्री टायर, १२ स्लिपर क्लास, २ जनरल सेकंड क्लास, २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two special trains for Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.