वर्गात घुसून दोन शिक्षकांना मारहाण
By admin | Published: September 6, 2014 02:23 AM2014-09-06T02:23:04+5:302014-09-06T02:23:04+5:30
संस्थेने शिपायाला सेवेतून कमी का केले, असा जाब विचारत वीस ते पंचवीस युवकांच्या जमावाने वर्गात घुसून दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली.
Next
सांगोला (जि. सोलापूर) : संस्थेने शिपायाला सेवेतून कमी का केले, असा जाब विचारत वीस ते पंचवीस युवकांच्या जमावाने वर्गात घुसून दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी नाझरा येथील विद्यामंदिर प्रशालेत घडली. शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना वर्गात घुसून बेदम मारहाण केलेला प्रकार निंदनीय असून या घटनेचा शिक्षक, संघटनेसह सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
विद्यामंदिर प्रशालेतील हरीदास खरात या शिपायास संस्थेने शासनाच्या आदेशानुसार सेवेतून कमी केले आहे. मात्र मला सेवेतून कमी करण्यास शिक्षकांचाच हात असल्याचा आरोप हरीदासने केला. यावरून संतप्त झालेल्या हरीदासचे वीस ते पंचवीस निकटवर्तीय शुक्रवारी सकाळी पावणोआकराच्या सुमारास 11 वी -12 वीच्या वर्गात घुसून अध्यापन करणा:या प्रा. गंगाधर घोंगडे व प्रा. महेश विभुते यांच्या वर्गात घुसून विद्याथ्र्याच्या समोरच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी हस्तक्षेप करीत जमाव व ग्रामस्थांना प्रशालेच्या आवारातून हुसकावून लावले. मुख्याध्यापक सुभाष महिमकर यांनी त्या शिपाई व जमावाविरुद्ध पोलिसात तक्रारी अर्ज दिला आहे. या घटनेतील विभुते यांना पंढरपूरच्या अतिदक्षता विभागात तर घोंगडे यांना सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.