पंढरपुरातील अडथळा ठरणारी दोन मंदिरे भुईसपाट

By admin | Published: May 12, 2015 01:15 AM2015-05-12T01:15:32+5:302015-05-12T01:15:32+5:30

येथील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले पार्किंगचे काम दोन मंदिराच्या अडथळ्यामुळे बंद होते

The two temples of the Pandharpur block, Bhuissapat | पंढरपुरातील अडथळा ठरणारी दोन मंदिरे भुईसपाट

पंढरपुरातील अडथळा ठरणारी दोन मंदिरे भुईसपाट

Next

पंढरपूर : येथील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले पार्किंगचे काम दोन मंदिराच्या अडथळ्यामुळे बंद होते. सोमवारी अतिक्रमण कारवाईत ही दोन्ही मंदिर काढून टाकण्यात आली असून, येत्या काही दिवसात भाविकांना पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध होणार आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. शकडो वाहनेही पंढरपूर येत असतात. यामुळे शहरात शिवाजी चौक, गजानन महाराज मठ, इंदिरा भांजी मंडईच्या परिसरातील रस्त्यावर ही वाहने उभी असतात. यामुळे शहरवासियांना त्रास सहन करावा लागत होता. अनेक महिन्यापासून हे काम बंद होते. मात्र शनिवारी तहसिलदार गजानन गुरव, मुख्याधिकारी शंकर गोरे, पो.नि. किशोर नावंदे यांनी पार्किंगच्या बांधकामत अडथळा ठरत असलेली दोन्ही मंदिर पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: The two temples of the Pandharpur block, Bhuissapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.