दोन बंधाऱ्यांना लागली गळती
By admin | Published: July 21, 2016 03:13 AM2016-07-21T03:13:35+5:302016-07-21T03:13:35+5:30
मोखाडा कृषी विभागाने लाखों रुपयांचा खर्च करून खोडाळा येथील मोहिते कॉलेज व जोगलवाडी लगत उताराला एका पाठोपाठ एक असे दोन बंधारे बांधले
मोखाडा : मोखाडा कृषी विभागाने लाखों रुपयांचा खर्च करून खोडाळा येथील मोहिते कॉलेज व जोगलवाडी लगत उताराला एका पाठोपाठ एक असे दोन बंधारे बांधले आहेत. परंतु, निकृष्ट बांधकामामुळे पहिल्याच पावसात या बंधाऱ्यांना गळती लागली आहे.
वर्ष २०१५-१६ च्या एप्रिल- मे मध्ये या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले होते. उताराच्या सुरवातीला बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर १६ लाख रुपये खर्च करून ३४ मीटर लांबीचा तर त्याच्याच लगत असलेल्या बंधाऱ्यावर १४ लाखांच्या आसपास खर्च करुन २८ मीटर लांबीचा बंधारा बांधण्यात आला आहे. गळती लागल्योन शेतीसाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या उद्देशालाच खिळ बसली आहे. तसेच या बंधाऱ्याचे काम चालू असताना लगतच्या गाव पाडयातील ग्रामस्थांनी हे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्र ारी केल्या होत्या. लोकमतने ही बाब तालुका कृषी अधिकारी वाणी यांच्या निदर्शनास आणून दिली होती.त्यांनी हे निकृष्ट बांधकाम थांबवणार असल्याचे सांगितले होते. (वार्ताहर)
>खोडाळा व जोगलवाडी बंधाऱ्यांच्या बांधकामाची तज्ज्ञांकडून चौकशी करण्यात येईल. तसेच जर यात कुणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.
- आर. जे. पाटील,
जिल्हा कृषी अधिक्षक