निवडणुकीत काळा पैसा वापरण्यासाठी दोन हजाराची नोट
By admin | Published: January 18, 2017 09:01 PM2017-01-18T21:01:54+5:302017-01-18T21:01:54+5:30
उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काळा पैसा वापरता यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर दोन हजाराची नोट चलनात आणल्याचा आरोप
Next
dir="ltr">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.18 - उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काळा पैसा वापरता यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर दोन हजाराची नोट चलनात आणल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केला. रिझर्व्ह बँकेला घेराव घातल्यानंतर आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
देशातील काळा पैसा, दशहतवाद व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरला केला होता. त्यांच्या घोषणेनंतर संपूर्ण देश त्यांच्या पाठिमागे उभा होता. परंतु यातील एकही हेतु साध्य होताना दिसत नसल्याने आता मूळ हेतू सोडून कॅशलेस व्यवहार सुरू केला आहे. कोणत्याही देशात शंभर टक्के कॅशलेस व्यवहार होत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांना कमिशन मिळावे. यासाठी कॅशलेस व्यवहाराची सक्ती के ली जात असल्याचा टीका चव्हाण यांनी केली.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधानांच्या दबावाखाली नोटाबंदीचा निर्णय घेतला. यामुळे या बँकेची स्वायत्तता धोक्यात आली असल्याने पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच रिझर्व्ह बँकेपुढे शांततेत आंदोलन ससुरू असताना पोलिसांनी अचानक कार्यक र्त्यावर लाठमार केला. या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाºयाला निलंबित करावे. अशी मागणी चव्हाण यांनी केली.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी खासदार गेव्ह आवारी, अॅड. अभिजित वंजारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.