दोन हजार पुनर्वसित आदिवासी मेळघाटात धडकले, मुलाबाळांसह परतले मूळगावी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 07:19 PM2017-09-09T19:19:53+5:302017-09-09T19:52:48+5:30

पाच वर्षांपूर्वी तालुक्यांतून पुनर्वसित झालेले आठ गावांमधील दोन हजारांवर आदिवासी शनिवारी दुपारी ३ वाजता मुलाबाळांसह मूळगावी परतले.

Two thousand repatriated tribal people clashed in Melghat, returned with their children | दोन हजार पुनर्वसित आदिवासी मेळघाटात धडकले, मुलाबाळांसह परतले मूळगावी

दोन हजार पुनर्वसित आदिवासी मेळघाटात धडकले, मुलाबाळांसह परतले मूळगावी

googlenewsNext

चिखलदरा, दि. 9 -  पाच वर्षांपूर्वी तालुक्यांतून पुनर्वसित झालेले आठ गावांमधील दोन हजारांवर आदिवासी शनिवारी दुपारी ३ वाजता मुलाबाळांसह मूळगावी परतले. संबंधित अधिका-यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने व कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त आदिवासींनी शेकडो पोलीस, कमांडो आणि वनकर्मचा-यांचा ताफा भेदत कूच केले. 

तालुक्यातील सोमठाणा खुर्द, अमोना नागरतास, गुल्लरघाट, केलपाणी, धारगढ व बारूखेडा येथील आदिवासींचे व्याघ्र प्रकल्पाच्या अतीसंरक्षित क्षेत्रातून सन २०११ ते २०१५ मध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले होते. पुनर्वसित वस्ती सोयी-सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने शिवाय वैद्यकीय सुविधादेखील न मिळाल्याने तब्बल २२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे भयावह आकडे आहेत. आदिवासींच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त आदिवासींनी ९ सप्टेंबर रोजी मूळ गावी परतण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी त्यांनी मूळ गावांकडे धाव घेतली. 

पोपटखेडा-खटकाली गेटवर या आदिवासींना अडवून माजी आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे, प्रवीण तेलगोटे, विकास खंडेझोड, रवि जावरकर, बाबूलाल बेठेकर आदींसह अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, उपवनसंरक्षक विशाल माळी आदींनी आदिवासींचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. खटकाली नाक्याचे कुलूप फोडल्यानंतर आदिवासी विरूद्ध प्रशासन असा संघर्ष उदभवण्याची चिन्हे होती. मात्र, प्रशासनाने मवाळ भूमिका घेतल्याने ती स्थिती टळली. 

दुपारी ३ वाजता तोडले गेटचे कुलूप 
आदिवासींनी मेळघाटात परतण्याचा इशारा दिल्याने शनिवारी व्याघ्र प्रकल्पात अलर्ट जारी करण्यात आला होता. खटकाली, झरी, तलई, अमोना, ढाकणा हे सर्व गेट सील करण्यात आले होते. व्याघ्र प्रकल्पाचे अतीजलद दल, कमांडो, पोलीस, वनकर्मचाºयांचा मोठा ताफा तैनात होता. तरीही हा चक्रव्यूह भेदून आदिवासी महिलांनी गेटचे कुलूप फोडून दुपारी ३ वाजता आत प्रवेश केला. 
सोमवारी बैठकीचा प्रयत्न 
मूळगावी परतलेल्या हजारो आदिवासींना परत पुनर्वसित गावांमध्ये आणून व त्यांची समजूत काढून सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहे. सोमवारी यासंदर्भात बैठक बोलविण्याबाबत अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी चर्चा केली. 

पुनर्वसितांच्या या आक्रोशासाठी प्रशासनच जबाबदार आहे. आता आदिवासींचे मन वळविण्यासाठी सोमवारी बैठक बोलविली आहे. त्यात तोडगा काढू.
- राजकुमार पटेल, माजी आमदार, मेळघाट

वरिष्ठांसोबत चर्चा करून पुनर्वसित आदिवासींच्या सर्व समस्या निकाली काढण्याबाबत बैठक बोलविण्यात येईल. 
- उदय राजपूत, उपविभागीय अधिकारी, अकोट

व्याघ्र प्रकल्पांत विनापरवाना शिरणाºयांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यांना यापूर्वीसुद्धा सूचना दिल्या आहेत.
- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग

Web Title: Two thousand repatriated tribal people clashed in Melghat, returned with their children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.