तीन महिन्यांत दोन हजार झोपड्या जमीनदोस्त

By admin | Published: July 14, 2017 03:04 AM2017-07-14T03:04:17+5:302017-07-14T03:04:17+5:30

अनधिकृत झोपड्यांविरोधात महानगरपालिकेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली

Two thousand slums fell into three months | तीन महिन्यांत दोन हजार झोपड्या जमीनदोस्त

तीन महिन्यांत दोन हजार झोपड्या जमीनदोस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अनधिकृत झोपड्यांविरोधात महानगरपालिकेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून, एप्रिल महिन्यापासून जवळपास दोन हजार अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या आहे. अतिक्रमण विभागाच्या धडक कारवाईतंर्गत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या २१,४२७ फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
अनधिकृत झोपड्यांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होते. शहरातील स्वच्छता, सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विविध मोहीम राबविल्या जात आहेत. शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी धडक कारवाई केली जात असल्याचे दिसून येते. अतिक्रमण विरोधी मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्वच विभागात धडक कारवाई करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये ९४० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली असून मे महिन्यात १२१५ झोपड्या, जूनमध्ये ५८ झोपड्या अनधिकृत झोपड्या निष्कासित केल्या आहेत. अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली असून एप्रिल महिन्यामध्ये ८ हजार ५२२ फेरीवाले, मे महिन्यात ६ हजार ९१६ आणि जूनमध्ये ५हजार ९८९ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच बेलापूरमधील १०८, तुर्भे येथील ५१२, कोपरखैरणेतील ३३२, घणसोलीतील १०८ आणि दिघ्यातील ७४ अशा एकूण १ हजार १३७ अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. गेल्या दहा दिवसांमध्ये अनधिकृतरीत्या उभारलेल्या ८० होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत अतिक्रमण विभागाच्या कारवाईतंर्गत ६० हजार रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली जात आहे.

Web Title: Two thousand slums fell into three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.