भीमानदीवरील पुलावर वाळूच्या ट्रकचे दोन बळी, मामा-भाचे जागीच ठार

By admin | Published: October 26, 2016 09:35 PM2016-10-26T21:35:43+5:302016-10-26T21:35:43+5:30

दौंड येथील भीमानदीवरील वाहतूक पुलावर वाळूच्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात मामा-भाचे जागीच ठार झाले. हा अपघात दुपारी सव्वाचारच्या सुमारास झाला.

Two trucks of sand trucks on the highway, dead and uncles killed on the spot | भीमानदीवरील पुलावर वाळूच्या ट्रकचे दोन बळी, मामा-भाचे जागीच ठार

भीमानदीवरील पुलावर वाळूच्या ट्रकचे दोन बळी, मामा-भाचे जागीच ठार

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 26 - दौंड येथील भीमानदीवरील वाहतूक पुलावर वाळूच्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात मामा-भाचे जागीच ठार झाले. हा अपघात दुपारी सव्वाचारच्या सुमारास झाला. 
अशोक सांगळे (रा. गोपाळवाडी, ता. दौंड), संदीप सोनवणे (रा. सोनवडी, ता. दौंड) हे दोघे अपघातात ठार झाले आहेत. तर ट्रक चालक आणि क्लिनर हे दोघे फरार झाले आहेत. 
दुचाकीवरील दोघेजण अहमदनगर येथून दौंडला येत होते. भीमा नदीवरील पुलावर पडलेला खड्डा चुकवत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाºया वाळूच्या ट्रकने (एमएच १२ सीटी ७0२) दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक संदीप सोनवणे हे दुचाकीसह पूलावरुन भीमा नदीत साधारणत: ३0 ते ४0 फूल खाली फेकल्या गेले. तर त्यांचे पाठीमागे बसलेले अशोक सांगळे हे पूलावर जागीच ठार झाले. 
दरम्यान वाळूचा ट्रक पूलाचा संरक्षण कठडा तोडून अर्धा पूलाच्या बाहेर आला. तर ट्रकचा अर्धाभाग पूलावर होता. यावेळी दौंड-अहमदनगर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर आणि त्यांचे सहकारी पोलीस यांनी घटनास्थळी परिस्थितीची पाहणी केली. 
 
जीवावर बेतून नावाड्यांनी शोधला मृतदेह-
अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शनी लोकांनी सांगितल्यानुसार एकदुचाकी चालक दुचाकीसह पाण्यात पडला आहे. तेव्हा एका होडीत पाच ते सहा नावाडी आले. त्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यातून मृतदेह शोधून काढला. ज्या ठिकाणी मृतदेह नावेतून शोधला जात होता. त्या ठिकाणापासून उंचावर वाळूचा ट्रक अर्धा पूलाच्या बाहेर आला होता. तेव्हा नावाड्यांच्या अंगावर हा ट्रक कधी कोसळेल याची शाश्वती नव्हती. कारण सदरचा पूल हा कमकुवत आहे. पूलावरुन दुचाकी गेली तरी पूलाला हादरे बसतात. तेव्हा या परिसरातून जड वाहने मार्गस्थ होत होते. या जड वाहनांच्या धक्याने जर ट्रक नदीत कोसळला असता तर हा ट्रक सरळ नावाड्यांच्या अंगावर पडला असता मात्र या गोष्टीची कुठलीही पर्वा न करता नावाड्यांनी पाण्यातील मृतदेह शोधून काढला. 
 
दौंडला शोककळा-
दौंड येथे झालेल्या अपघातातील एक गोपाळवाडीचे तर दुसरे सोनवडीचे रहिवाशी आहेत. दरम्यान ही दोन्ही गावे दौंडच्या शिवेवर आहेत. या घटनेमुळे ऐनदिवाळीत दौंड शहर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. 

Web Title: Two trucks of sand trucks on the highway, dead and uncles killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.