पाण्यात बुडुन दोन महिलांचा मुत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 06:41 PM2016-11-03T18:41:46+5:302016-11-03T18:41:46+5:30

बेलवण नदीवर कपडे धुण्यास गेलेल्या नणंद-भावजयीचा पाण्यातील खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी उदनवाडी, ता.सांगोला येथील राजूरी रोडवरील

Two women have died after being drowned in water | पाण्यात बुडुन दोन महिलांचा मुत्यू

पाण्यात बुडुन दोन महिलांचा मुत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत/अरूण लिगाडे 
 
सांगोला, दि. 03 - बेलवण नदीवर कपडे धुण्यास गेलेल्या नणंद-भावजयीचा पाण्यातील खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी उदनवाडी, ता.सांगोला येथील राजूरी रोडवरील बेलवण नदीपात्रात घडली आहे. सुवर्णा तुकाराम गाडे(30) व अश्‍विनी दिपक गाडे (25) दोघीही रा.उदनवाडी, ता.सांगोला असे मरण पावलेल्या नणंद-भावजयीचे नाव आहे. दीपावलीच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्याने उदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत होती. 
    उदनवाडी येथील सुवर्णा तुकाराम गाडे व अश्‍विनी दिपक गाडे या नणंद-भावजयी गुरुवारी  राजूरी रोडवरील बेलवण नदीवर कपडे धुण्यास गेल्या होत्या. पुलाशेजारी असणार्‍या खड्ड्याजवळ दोघीही कपडे धुत होत्या. यावेळी, खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाय घसरुन पडल्याने दोघीही पाण्यात बुडाल्या.  यावेळी आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, दिपक गाडे यांनी पत्नी अश्‍विनी बराच वेळ झाला तरीही कपडे धुवून घराकडे परतली नसल्याने बंधार्‍यावर गेले असता त्यांना कपडे, चप्पला बंधार्‍याच्या कडेवर दिसून आले. मात्र पत्नी अश्‍विनी व सुवर्णा गाडे दिसून येत नसल्याने दोघी पाण्यात तरी बुडाल्या नसतील ना  म्हणून आरडाओरड सुरु केला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी नदीवर धाव घेवून पाण्यातील डोहात शोधाशोध केली असता पत्नी अश्‍विनी व सुवर्णा गाडे मयत अवस्थेत मिळून आल्या.   विजय जयवंत गाडे यांनी पोलीसात खबर दिली असून घटनास्थळी सपोनि शिवाजी विभुते व पो.कॉ. शिवाजी जाधव यांनी धाव घेवून-  घटनास्थळावर पंचनामा केला आहे. 
 
- सुवर्णा तुकाराम गाडे या अविवाहीत असून अश्‍विनी दिपक गाडे यांना एक मुलगा, एक मुलगी, आहे. तर पती दिपक गाडे शेतकरी सूत गिरणी मध्ये इलेक्ट्रीकल ऑपरेटर म्हणून नोकरीस आहेत.

Web Title: Two women have died after being drowned in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.