दुचाकी घसरल्याने ट्रेलरखाली चिरडून मृत्यू , तारा गावाजवळ अपघातात महिला ठार : मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:30 AM2017-09-09T04:30:45+5:302017-09-09T04:30:57+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर तारा गावानजीक रस्त्यावरील पडलेल्या खडीमुळे मोटारसायकल घसरून एक महिला रस्त्यावर पडली.

Two women killed in road accident in Tara village, killed in road accidents | दुचाकी घसरल्याने ट्रेलरखाली चिरडून मृत्यू , तारा गावाजवळ अपघातात महिला ठार : मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन

दुचाकी घसरल्याने ट्रेलरखाली चिरडून मृत्यू , तारा गावाजवळ अपघातात महिला ठार : मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन

Next

मोहोपाडा / पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावर तारा गावानजीक रस्त्यावरील पडलेल्या खडीमुळे मोटारसायकल घसरून एक महिला रस्त्यावर पडली. मात्र, मागून आलेल्या ट्रेलरखाली चिरडली गेल्याने तिचा मृत्यूू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडला. या वेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ केल्याने, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
ठाणे येथे राहणाºया भाग्यश्री शिंदे पेण तालुक्यात नातेवाईकांकडे आल्या होत्या. सकाळी ठाण्याला मोटारसायकलने जाण्यासाठी निघाल्या. तारा गावानजीक आल्यावर रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे त्यांची मोटारसायकल घसरली. त्या वेळी पाठीमागून येणाºया ट्रेलरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ केला. अपघात झाल्यानंतर ट्रेलरचालक पळून गेला. त्याला पकडण्यासाठी नागरिकांनी ‘रास्ता रोको’ केला होता. पोलिसांनी ट्रेलर चालकाला पकडल्यानंतर ‘रास्ता रोको’ आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनामुळे झाल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होती.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या पळस्पे ते इंदापूरदरम्यान पहिल्या टप्प्याचे काम २००७ पासून सुरू आहे. दहा वर्षे उलटूनदेखील हे काम अद्याप पूर्ण न झाल्याने, ग्रामस्थ संतप्त आहेत. त्यामुळे हे कितपत सहन करायचे? अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिली. रुंदीकरणाचे काम कारणाºया कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या वेळी ठाकूर यांनी केली.
खड्ड्यांमुळे अपघात-
मुंबई-गोवा रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, या रस्त्यावरून वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात खड्डे पाण्याने भरल्याने, वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अधिक अपघात होतात. या रस्त्यालगत टाकलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी या रस्त्याचे कायमस्वरूपी काम करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Two women killed in road accident in Tara village, killed in road accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात