जळगावमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 08:58 PM2016-07-24T20:58:26+5:302016-07-24T20:58:26+5:30
जिल्ह्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 24 - जिल्ह्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. एकाचा धरणाच्या पाण्यात तर दुसऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला.
शुभम आधार पाटील (वय १६,रा. धारागीर ता. एरंडोल) आणि शेख अरमान शेख सईद (वय १६, रा. आगवाली चाळ, भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत.
शुभम हा धुपे ता. चोपडा येथील रहिवासी होता. तो धारागीर येथे मामाकडे शिक्षणासाठी आला होता. सकाळी तो गुरे चारण्यासाठी अंजनी धरणानजीक गेला होता. त्यावेळी गायीने त्याला पाण्यात लोटले. त्यावेळी झालेल्या झटापटीत गाळात फसल्याने त्याचा व गायीचाही मृत्यू झाला.
अरमान हा मनीष सुभाष हिवरे (वय २०, आगवाली चाळ, भुसावळ) याच्यासह तापी नदीत आंघोळीसाठी गेला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. त्यात अरमानचा बुडून मृत्यू झाला. त्यावेळी समोरच असलेल्या काही युवकांनी मनीषला वाचविले.