कोल्हापूरातील पंचगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

By admin | Published: March 14, 2017 07:46 PM2017-03-14T19:46:31+5:302017-03-14T19:46:31+5:30

येथील पंचगंगा नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मयूर सुरेश बनसोडे (१९) आणि गणेश बबन खोपकर (१९) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

Two youths die drowning in Panchaganga river of Kolhapur | कोल्हापूरातील पंचगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

कोल्हापूरातील पंचगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 -  येथील पंचगंगा नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मयूर सुरेश बनसोडे (१९) आणि गणेश बबन खोपकर (१९) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर बनसोडे याच्या भाच्याच्या वाढदिवसासाठी मयूर आणि गणेश खोपकर वडणगेत या गावी आले होते. यावेळी ते दोघे अक्षय नथुराम गोळे या त्यांच्या मित्रासोबत आज दुपारी दीडच्या सुमारास नदीत पोहायला गेले होते. विशेष म्हणजे, या तिघांनाही पोहता येत नव्हते. दरम्यान, पोहायला गेले असता अक्षयला मोबाईलची रिंग ऐकू आली. त्यामुळे अक्षय पाण्याबाहेर आला आणि मोबाईलवर बोलून तो परत पाण्यात जायला निघाला. त्यावेळी दोघेही दिसेनासे झाले. त्यानंतर अक्षयने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याचा आरडाओरडा एकूण गावातील काही तरुणांनी नदीत उडी टाकून शोध घेतला असता,  या दोघांचे मृतदेह हाती लागले.
या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आले आहेत. हे दोघे मूळचे मुंबईतील सायन येथील रहिवाशी असल्याचे समजते.  
 

Web Title: Two youths die drowning in Panchaganga river of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.