टीवायबीकॉमचा निकाल जाहीर

By admin | Published: June 27, 2014 01:02 AM2014-06-27T01:02:50+5:302014-06-27T01:02:50+5:30

मुंबई विद्यापीठामार्फत श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार घेण्यात आलेल्या टीवायबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जाहीर करण्यात आला.

TYBcom's results were announced | टीवायबीकॉमचा निकाल जाहीर

टीवायबीकॉमचा निकाल जाहीर

Next
>मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार घेण्यात आलेल्या  टीवायबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जाहीर करण्यात आला. विद्यापीठाने लागू केलेल्या श्रेयांक श्रेणी पद्धतीचा टीवायबीकॉमचा हा पहिलाच निकाल आहे. या परीक्षेचा निकाल 73.71 टक्के लागला आहे.
विद्यापीठामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेला 63 हजार 757 विद्यार्थी बसले होते. यापैकी 46 हजार 839 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 16 हजार 710 विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले आहेत. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास टीवायबीकॉमचा सेमिस्टर सहाचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. विद्याथ्र्याना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. टीवायबीकॉम परीक्षेसाठी 64 हजार 2 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. यापैकी 11 विद्याथ्र्याचा प्रवेश रद्द झाला. 63 हजार 991 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. तर 234 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या पारंपरिक पद्धतीत बदल करत तीन वर्षापूर्वी श्रेयांक श्रेणी पद्धत लागू केली होती. या पद्धतीनुसार टीवायची परीक्षा घेण्यात आली. या श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार जाहीर होणारा टीवायबीकॉमचा हा पहिलाच निकाल ठरला आहे. विद्यापीठातील अधिका:यांकडून होणारा विरोध मोडून काढत नवनियुक्त परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेला टीवायबीकॉमचा निकाल वेळेत जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: TYBcom's results were announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.