नीटच्या गोंधळाचा फायदा घेण्याचा प्रकार

By Admin | Published: May 17, 2016 01:50 AM2016-05-17T01:50:44+5:302016-05-17T01:50:44+5:30

राज्यातील विद्यार्थ्यांवर नीट परीक्षा लादली गेल्यामुळे विद्यार्थी व पालक गोंधळले आहेत.

Types of Benefits of Troubleshooting | नीटच्या गोंधळाचा फायदा घेण्याचा प्रकार

नीटच्या गोंधळाचा फायदा घेण्याचा प्रकार

googlenewsNext


पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांवर नीट परीक्षा लादली गेल्यामुळे विद्यार्थी व पालक गोंधळले आहेत. मात्र, शहरातील काही क्लासचालक या गोष्टीकडे कमाईची संधी म्हणून पाहत आहेत. परंतु, सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर एका दिवसात किंवा दोन महिन्यांत तयारी करून नीट परीक्षा देणे अवघड आहे. त्यामुळे एका दिवसात तयारी करून मेडिकलला प्रवेश मिळवा, अशा खोट्या प्रलोभनांना कोणीही बळी पडू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांवर नीट परीक्षा लादली गेली असून त्यांना दोन महिन्यांत अभ्यास करून नीट परीक्षेत यश मिळविण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे पालक व विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. परीक्षेची तयारी कशी करावी, कोण कमी खर्चात आपल्याला मार्गदर्शन करू शकेल, याचा शोध विद्यार्थी घेत आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे नफेखोरीच्या दृष्टीने पाहणाऱ्यांनी या संधीचा फायदा घेतला आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच बहुतेक महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोर नीट परीक्षेच्या तयारी कशी करता येईल, याबाबतचे फ्लेक्स लावले आहेत. एक हजार रुपयांमध्ये नीटबाबत मार्गदर्शन करणार असल्याची जाहिरात त्यातून केली जात आहे. त्यामुळे पालकांनी आपली आर्थिक लूट होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
>नीट परीक्षेसाठी सीबीएसई बोर्डाच्या अकरावी-बारावीच्या पुस्तकांमधील १०५ चॅप्टरचा (प्रकरणांचा) अभ्यास करावा लागतो. कोणी खोटी प्रलोभने दाखवत असेल, तर भूलथापांना बळी पडू नका. अनेक व्यक्ती या गोंधळलेल्या स्थितीचा गैरफायदा घेत आहेत.
गजानन एकबोटे, माजी उपकुलगुरू, आरोग्यविज्ञान विद्यापीठ

Web Title: Types of Benefits of Troubleshooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.