टंकलेखन परीक्षेला ‘पूर्णविराम’

By admin | Published: June 17, 2016 12:53 AM2016-06-17T00:53:42+5:302016-06-17T00:53:42+5:30

टाईप रायटरची टक टक रविवारी अखेरची असणार आहे. कारण टंकलेखनाच्या परीक्षांना आता फुलस्टॉप मिळाला आहे. राज्यभरातील टंकलेखन परीक्षा बंद होणार असून, त्याची जागा आता संगणक घेणार आहे.

Typing test for 'period' | टंकलेखन परीक्षेला ‘पूर्णविराम’

टंकलेखन परीक्षेला ‘पूर्णविराम’

Next

- लीनल गावडे , मुंबई
टाईप रायटरची टक टक रविवारी अखेरची असणार आहे. कारण टंकलेखनाच्या परीक्षांना आता फुलस्टॉप मिळाला आहे. राज्यभरातील टंकलेखन परीक्षा बंद होणार असून, त्याची जागा आता संगणक घेणार आहे.
पूर्वी नोकरी करायची म्हटली की, टायपिंग येणे आवश्यक असायचे. दहावीची परीक्षा झाली की, शॉर्ट हँड, लाँग हँड टाईपिंग शिकण्यासाठी पालक मुलांना ‘टाईपिंग’च्या शिकवण्या हमखास लावून देत. त्यामुळे उन्हाळी सुटीत टायपिंगची टकटक सर्वत्र ऐकू यायची. सिनेमात दाखवलेल्या आॅफिसमधील प्रत्येक दृश्यात टाईपरायटरवर काम करणारी मंडळी हमखास नजरेस पडायची. बॉसच्या सांगण्यावरुन टाईपरायटर आॅपरेट करणारी व्यक्ती अगदी महत्त्वपूर्ण भूमिकेत अनेकांच्या नजरेस पडायची. त्यामुळे आॅफिसमध्ये नोकरी करायची असेल तर टंकलेखनाचे ज्ञान हवेच, असे होते. पण बदलत्या काळानुसार मोठाल्या टाईपरायटरची जागा संगणकाने घेतली. संगणक अनेकांच्या पसंतीस उतरु लागला आणि कालांतराने टाईपरायटर मागे पडला.

रविवारी अखेरची परीक्षा
अगदी आतापर्यंत टाईपरायटरटची टकटक ऐकू येत होती. पण संगणकाचे वाढते महत्त्व लक्षात घेत राज्य शासनाने टंकलेखन परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा टंकलेखनाची शेवटची परीक्षा असून ती रविवारी घेण्यात येणार आहे.

Web Title: Typing test for 'period'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.