उबेरचा महाराष्ट्र सरकारशी करार, पाच वर्षात ७५ हजार रोजगार निर्मितीचा दावा
By admin | Published: February 16, 2016 07:23 PM2016-02-16T19:23:15+5:302016-02-16T19:30:25+5:30
देशात टॅक्सी सेवेत अग्रेसर असलेल्या उबेरने राज्यभरात येत्या पाच वर्षात ७५,००० नोक-या उपलब्ध करुन देण्याचा दावा केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - देशात टॅक्सी सेवेत अग्रेसर असलेल्या उबेरने राज्यभरात येत्या पाच वर्षात ७५,००० नोक-या उपलब्ध करुन देण्याचा दावा केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि उबेर यांच्यात एक सामज्यंस करार करण्यात आला आहे.
उबेर महाराष्ट्रातील दुर्लक्षित अशा भागातील महिलांसह इतर नागरिकांना प्रशिक्षण देणार असून या माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर सर्व समाजातील लोकांना सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच, यामध्ये पुरेसा पैशा मिऴविण्यासोबत व्यक्तीगत व्यवसाय सुद्धा करता येणार असल्याचे उबेरचे म्हणणे आहे. याचबरोबर येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये जवळपास ७५ हजार नवीन नोक-या उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही उबेरने दिले आहे.