उदय पाटलांच्या पत्नीसह १२ जणांचा अटकपूर्व जामीन नामंजूर
By admin | Published: October 23, 2016 03:16 PM2016-10-23T15:16:41+5:302016-10-23T15:16:41+5:30
सोन्याची साखळी पळवून नेल्याप्रकरणी उदय पाटील यांची पत्नी अंबिका, आई रोहिणी रमेश पाटील यांच्यासह १२ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी फेटाळून लावला.
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 23 - घरगुती वादातून शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि रवी पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळवून नेल्याप्रकरणी उदय पाटील यांची पत्नी अंबिका, आई रोहिणी रमेश पाटील यांच्यासह १२ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी फेटाळून लावला.
मल्लिकार्जुन सिद्धाराम पाटील, महेश उर्फ बाळू शिवशंकर माने, शुभम सूर्यकांत वाले, भारत प्रभाकर वाले, दत्ता भीमराव गराडे, आनंद प्रल्हाद पवार, समीर सूर्यकांत वजीरकर, गिरीश मल्लिनाथ केवडे, आदित्य लक्ष्मीकांत दायमा, शिवानंद उर्फ प्रशांत गुरुसिद्धप्पा पाटील अशी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेल्यांची नावे आहेत. २४ सप्टेंबर रोजी रवी पाटील हे घराबाहेर पडत होते. त्यावेळी पूर्वीचा राग मनात धरून उदय पाटील, रोहित पाटील आणि अन्य आरोपींनी रवी पाटील यांच्या अंगावर जाऊन मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील २० तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेतली.
आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर इतर गुन्हेही दाखल आहेत. आरोपींकडून २० तोळे सोन्याची चेन हस्तगत करायची आहे. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपींच्या वतीने अॅड. व्ही. डी. फताटे यांनी काम पाहिले.