उजनीत आले १३ दिवसात १६ टक्के पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:05 PM2019-07-12T12:05:55+5:302019-07-12T12:07:28+5:30
पुणे जिल्ह्यातील भीमा खोºयातील मावळ भागात खडकवासला, टेमघर, पानशेत, आंद्रा या भागात पाऊस चांगला असून इंद्रायणी भरून वाहत आहे.
भीमानगर : उजनी धरणात गेल्या १३ दिवसांमध्ये १६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. २९ जूनपासून ११ जुलैपर्यंत ही वाढ झाली आहे. गुरुवारी वजा ४३.५९ टक्के धरणात पाणीसाठा झाला म्हणजेच ७ टीएमसी पाणी उजनीत आले आहे. यामध्ये ७ जुलैपासून खºया अर्थाने झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता १४ हजार ५०० क्युसेकने दौंडमधून विसर्ग होत होता. दुपारी १२ वाजता १९ हजार ९७३ क्युसेक सुरू होता तर सायंकाळी ६ वाजता बंडगार्डन २५ हजार २१८ तर दौंडमधून १४ हजार ११५ क्युसेकने विसर्ग सुरूच होता.
गुरुवारी खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने मुठा नदीत पाणी सोडून दिले आहे. नागरिकांना खबरदारीचा आदेश दिला आहे. दरम्यान, भीमा खोºयात गुरुवारी दिवसभर वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्यामुळे पुणे जिल्ह्यातील भीमा खोºयातील मावळ भागात खडकवासला, टेमघर, पानशेत, आंद्रा या भागात पाऊस चांगला असून इंद्रायणी भरून वाहत आहे.
——
उजनीची स्थिती
एकूण पाणी पातळी ४८७.०० मीटर
एकूण पाणीसाठा ११४१.४४ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा वजा ६६१.३७ दलघमी
टक्केवारी वजा ४३.५९%
एकूण टीएमसी ४०.३१
उपयुक्त टीएमसी वजा २३.३५
विसर्ग : बंडगार्डन २५२१८
दौंडमधून १४११५