Maratha Reservation : उदयनराजे संतापले, म्हणाले.. खासदार, आमदारांना रस्त्यात जाब विचारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 02:58 PM2021-05-07T14:58:20+5:302021-05-07T15:26:23+5:30

Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे पुरावे दिलेले असताना देखील आरक्षण का मिळत नाही, याचा जाब आता लोकांनी आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून विचारला पाहिजे,' असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

Udayan Raje got angry over Maratha reservation | Maratha Reservation : उदयनराजे संतापले, म्हणाले.. खासदार, आमदारांना रस्त्यात जाब विचारा!

Maratha Reservation : उदयनराजे संतापले, म्हणाले.. खासदार, आमदारांना रस्त्यात जाब विचारा!

Next
ठळक मुद्दे खासदार, आमदारांना रस्त्यात अडवून जाब विचारा!मराठा आरक्षणासंदर्भातला निकाल समाजाला अंधकारात लोटणारा

सातारा : 'मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे पुरावे दिलेले असताना देखील आरक्षण का मिळत नाही, याचा जाब आता लोकांनी आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून विचारला पाहिजे,' असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

येथील विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, 'राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती जमाती आहेत, त्यांच्या आरक्षणाला धोका न पोहोचवता मराठा समाजाला आर्थिक दुर्बल म्हणून आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. गायकवाड समितीने अत्यंत अभ्यास करून आपला अहवाल सरकारकडे दिला होता. मात्र केवळ या समाजात आमदार, खासदार, मंत्री शिक्षण सम्राट आहेत म्हणून मराठा आरक्षण नाकारले गेले.

केवळ पाच टक्के लोकांकडे सत्ता आहे, साम्राज्य आहे. मात्र ९५ टक्के जनता भांगलायला व मजुरीला जाते. कुळ कायदा लागला तेव्हा मराठ्यांच्या जमिनी गेल्या. शासनाने सिलिंग लावलेत तेव्हा जमिनी गेल्या. आता या समाजातील लोकांपुढे मजुरी शिवाय पर्याय राहिलेला नाही. या समाजाला शिक्षणात ते आरक्षण मिळायला हवे होते. मात्र शासन तेही देऊ शकलेले नाही.'




भारताचा नागरिक म्हणून मी सांगतो अन्याय का खपवून घ्यायचा, असे स्पष्ट करत उदयनराजे पुढे म्हणाले की, 'आता इतका अंधकार पसरला आहे की मराठा समाजातील मुलांना सरकारने विष प्यायची परवानगी द्यावी नाहीतर, काही दिवसांनी नक्षलवादी तयार होतील जाती धर्मात तेढ निर्माण होईल. राज्य शासन केवळ केंद्र शासनाकडे हा विषय ठरवत आहे, वास्तविक हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे. आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करून देखील या मागणीला राज्यशासनाने बगल दिली. आरक्षणाची केस न्यायालयात उभी असताना त्या तारखेला राज्य शासनाचा वकील हजर राहत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब राज्याने पाहिलेले आहे.

आता कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू द्या, त्याच्या घरासमोर जावा. त्या आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून त्यांना बोलतं करा. मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही असं त्यांना विचारा. त्यांच्याकडून काही समाधान झाले नाही तर त्यांना पदावर राहायचा अधिकार नाही असे कळवा. लोकप्रतिनिधीनी कुठल्याही मस्तीत राहू नये. लोक त्यांची मस्ती उतरतील जनावरे परवडले नेतेमंडळी माणुसकी नाही, अशा तीव्र शब्दांमध्ये उदयनराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

उदयनराजे म्हणाले...

  • मराठा आरक्षण रद्द चा निकाल समाजाला अंधकारात लोटणारा
  • आता लोकांवर विष पिण्याची वेळ
  • तरुण नक्षलवादी बनतील
  • राजकारण गेलं चुलीत श्वेतपत्रिका काढा
  • जनावरे परवडले मात्र नेत्यांमध्ये माणुसकी नाही कोण

Web Title: Udayan Raje got angry over Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.