'स्टाईल इज स्टाईल', शिवसेनेच्या टीकेला उदयनराजेंचं स्टाईलीश उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 04:34 PM2019-09-24T16:34:39+5:302019-09-24T16:35:38+5:30

कॉलर उडवण्याच्या संदर्भातील व्यक्तव्यासंदर्भातही त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता टोला लगावला.

Udayan Raje stylish answer to Shiv Sena's criticism of 'collar style | 'स्टाईल इज स्टाईल', शिवसेनेच्या टीकेला उदयनराजेंचं स्टाईलीश उत्तर

'स्टाईल इज स्टाईल', शिवसेनेच्या टीकेला उदयनराजेंचं स्टाईलीश उत्तर

googlenewsNext

सातारा - जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भावुक झाले होते. उदयनराजेंनी आदराची भावना व्यक्त करत, टीका करणाऱ्यांनाही धारेवर घेतले. विशेष म्हणजे सामना मुखपत्रातील अग्रलेखात शिवसेनेने उदयनराजेंच्या कॉलर उडविण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यास, उदयनराजेंनी पहिल्यांदाचा त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले.   

कॉलर उडवण्याच्या संदर्भातील व्यक्तव्यासंदर्भातही त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता टोला लगावला. ''मला गाणे आवडतेत मी लावतो, कॉलर माझीय, चावीन नाहीतर फाडून टाकीन. दुसऱ्याला काय, त्याच्यावरही चर्चा. इश्यूबेस राजकारण करू नका, इश्यूबेस समाजकारण करा'', असे म्हणत सामनातील अग्रलेखावरुन उदयनराजेंनी शिवसेनेला उदयनराजे स्टाईल उत्तर दिले. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी कॉलर उडवून दाखवत स्टाईल इज स्टाईल, असेही म्हटले. 

साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते. आज महाळ आहेत, अस सांगताना पवारसाहेब मला पितृतुल्य असल्याचं ते म्हणाले. तसेच, मी लोकशाही मानणारा आहे, माझ्यावर अनेकांनी तोंडसुख घेतलं, काहीही बोलायचंय ते बोलले. मी उगीच इकडं तिकडं गेलो नाही. हसू का रडू तेच मला कळत नाही. आपण एकमेकांचा हात धरू शकतो, पण.... त्यांना योग्य वाटलं ते ते बोलले. मानसिक समाधान झालं असेल, नसेल तर अजून बोला. कुणी काय केलं, याचा लेखाजोखा लोकांपुढ मांडतो. मी आतापर्यंत समाजकारण केलं, राजकारण कधीही केलं नाही. मी आदराने बोलतो, खूप आदर आहे मला त्यांचा. नवाब मलिक हेही बोलले. त्यांच्याबद्दलही आदर आहे. पण, कधीतरी अंतर्मनात झाकून बघा. मी स्वाभिमान सोडलेला नाही, कुणीपण कायपण बोलायचं. मी ऐकून घ्यायचं. एवढ्या काय मी बांगड्या भरल्या नाहीत. हिंमत असेल तर चॅलेंज घ्या, कुणीपण या समोरासमोर बसा ! असे म्हणत उदयनराजेंनी टीकाकारांचा समावेश घेतला. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले आता पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. विधानसभा निवडणुकांसोबतच सातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होईल. तर, 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे. 
 

Web Title: Udayan Raje stylish answer to Shiv Sena's criticism of 'collar style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.