वाळू कारवाईतील जखमीमुळे उदयनराजे विरुद्ध प्रशासन वाद !

By admin | Published: June 10, 2016 09:11 PM2016-06-10T21:11:47+5:302016-06-10T21:11:47+5:30

वडोली भिकेश्वर, ता. क-हाड येथील वाळू ठेक्यावर महसूल खात्याने केलेली कारवाई वादाच्या भोव-यात सापडली आहे. कारवाईवेळी प्रांताधिका-यांनी अनेकांना मारहाण केल्याचा आरोप खासदार उदयनराजे

Udayan Raje's administration dispute because of sand injuries! | वाळू कारवाईतील जखमीमुळे उदयनराजे विरुद्ध प्रशासन वाद !

वाळू कारवाईतील जखमीमुळे उदयनराजे विरुद्ध प्रशासन वाद !

Next

- प्रांताधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी 'क-हाड बंद'ची हाक

क-हाड : वडोली भिकेश्वर, ता. क-हाड येथील वाळू ठेक्यावर महसूल खात्याने केलेली कारवाई वादाच्या भोव-यात सापडली आहे. कारवाईवेळी प्रांताधिका-यांनी अनेकांना मारहाण केल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय. तसेच प्रांताधिका-यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी त्यांनी शनिवारी 'क-हाड बंद'ची हाकही दिलीय.
याउलट 'ही कारवाई कायदेशीर मार्गानेच केली असून निलंबनाच्या कारवाईला मी भीत नाही,' असे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
क-हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वरमध्ये गुरूवारी महसूल प्रशासनाने कारवाई केली. संबंधित ठिकाणी कृष्णा नदीपात्रातून बोटी व पोकलॅनच्या माध्यमातून वाळू उपसा केला जात होता. कारवाईतून महसुलने वाळूने भरलेले २९ ट्रक, रिकामे ४० ट्रक, ५ पोकलॅन मशिन जप्त केल्या. तसेच वाळू उपशासाठी ठेकेदारांनी ३२ बोटींचा वापर केला होता. त्यापैकी काही बोटीही बाहेर काढून जप्त करण्यात आल्या. एकुण ५२ वाफे या कारवाईत उध्वस्त करण्यात आले. या ठेक्याची व्याप्ती जास्त असल्याने दोन दिवस कारवाईची मोहिम चालेल, असे गुरूवारी रात्री प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, शुक्रवारी ही कारवाई वादाच्या भोव-यात सापडली.
खासदार उदरयनराजे भोसले शुक्रवारी क-हाडमध्ये धडकले. कारवाईवेळी प्रांताधिका-यांनी अनेकांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या मारहाणीत जखमी झालेल्या सचिन पवार या युवकाची त्यांनी कृष्णा रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. तेथून ते पोलीस उपअधिक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र, उपअधिक्षक शिवणकर कार्यालयात उपस्थित नव्हत्या. त्यानंतर खासदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रांताधिका-यांनी कायदा हातात घेत ही कारवाई केल्याचा आरोप करून प्रांताधिका-यांना तातडीने निलंबित करण्याची व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार भोसले यांनी यावेळी केली.

दबावाला भित नसल्याचे प्रांताधिका-यांचे स्पष्टीकरण...
कारवाई कायदेशीर मार्गानेच केल्याचे सांगून कोणाच्या दबावाला मी भीत नाही, असे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Udayan Raje's administration dispute because of sand injuries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.