उदयनराजेंची पंतांसोबत खलबते!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:31 AM2019-01-31T06:31:59+5:302019-01-31T06:32:23+5:30

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Udayanraazena with friends! | उदयनराजेंची पंतांसोबत खलबते!

उदयनराजेंची पंतांसोबत खलबते!

Next

उदयनराजेंच्या लोकसभा उमेदवारीला राष्ट्रवादीतून सुरुवातीपासूनच विरोध आहे. तरीही सलग दोन टर्म उदयनराजे राष्ट्रवादीतून खासदार झाले. आता पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी बोहल्यावर चढून अक्षता टाका म्हणणाºया उदयनराजेंना राष्ट्रवादीतून विरोध होत आहे. उदयनराजेंनी मात्र दबावतंत्राचा पुरेपूर वापर केला आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार परिवर्तन यात्रेसाठी कºहाड, रहिमतपूर व फलटणमध्ये फडणवीस सरकारविरोधात रान पेटवत असताना उदयनराजे मात्र मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत खलबते करण्यात गुंतले होते.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र ही भेट राजकीय नव्हती, तर जिल्ह्यातील विकासकामांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती उदयनराजेंच्या निकटवर्तीयांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी साताºयात झालेल्या एका कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनाही एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. दोन राजे एकाच गाडीतून एका कार्यक्रमासाठी दाखल झाल्याने पुन्हा मनोमिलन झाल्याचा भास अनेकांना झाला. ‘राष्ट्रवादीकडून आता तिकीट फायनल,’ असे वक्तव्य साताºयातील कार्यकर्ते छातीठोकपणे सांगू लागले असतानाच उदयनराजेंनी वेगळीच ‘मूव्ह’ घेतली. राष्ट्रवादीचा विस्कटलेला पट सरळ करून उदयनराजेंच्या पाठीमागे प्याद्यांची गोळाबेरीज करण्याचे प्रयत्न दस्तूरखुद्द खासदार शरद पवार करीत असतानाच उदयनराजेंनी मंगळवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उदयनराजेंनी भाजपामध्ये यावे, ही फडणवीसांची जुनी इच्छा आहे. कुठलेही निमित्त काढून फडणवीस ती उदयनराजेंच्यासमोर व्यक्त करत असतात. या बैठकीतही त्याचे ‘रिपिटेशन’ झाले असण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता उदयनराजेंच्या निकटवर्तीयांनी फेटाळली आहे.
 

Web Title: Udayanraazena with friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.