Udayanraje Bhosale: खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोनाबाधित; गेल्या ४ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:04 PM2021-08-17T19:04:35+5:302021-08-17T19:05:30+5:30

Coronavirus: त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे

Udayanraje Bhosale affected from Coronavirus: He has been undergoing treatment in the hospital | Udayanraje Bhosale: खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोनाबाधित; गेल्या ४ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

Udayanraje Bhosale: खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोनाबाधित; गेल्या ४ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

googlenewsNext

सातारा – भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उदयनराजे यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिल्लीतून परतल्यानंतर खासदार उदयनराजेंना कोरोनाची लागण झाली. गेल्या ४ दिवसांपासून उदयनराजेंवर पुण्यात उपचार सुरु आहेत.

सातारा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले कोरोना बाधित(Coronavirus) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या कोरोना बाधित झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे उदयनराजे भोसले अधिवेशन सोडून परतले होते. त्यांच्या प्रकृती आता बरी आहे. मात्र, दरम्यानच्या काळात उदयनराजे भोसले यांना कोरोना झाल्याचे निदान झाले असून गेल्या चार दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील दोन दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचेही त्यांच्या निवटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

उदयनराजे भोसले यांनी कोरोनाच्या काळात दुकाने सुरु करावीत तसेच लोकांची विनाकारण अडवणूक करु नये, यासाठी भीकमांगो आंदोलन केले होते. कोरोनाच्या काळात प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला होता.

Web Title: Udayanraje Bhosale affected from Coronavirus: He has been undergoing treatment in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.