Udayanraje Bhosale: "इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही, शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर.."; उदयनराजेंचं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:28 PM2022-12-15T12:28:47+5:302022-12-15T12:30:28+5:30

वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

Udayanraje Bhosale says Democracy in india is only because of chhatrapati shivaji maharaj | Udayanraje Bhosale: "इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही, शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर.."; उदयनराजेंचं मोठं विधान!

Udayanraje Bhosale: "इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही, शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर.."; उदयनराजेंचं मोठं विधान!

googlenewsNext

सातारा-

सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची विविध मार्गांनी बदनामी करण्याचं काम केलं जात आहे. या विकृतीला वेळीच आवरलं पाहिजे. वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. ते सातऱ्यात एका कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती शिवरायांचं लोकशाहीतील योगदान पटवून देताना उदयनराजे यांनी यावेळी इस्लामिक देशांचं उदाहरण दिलं. 

"जगात आज जर इस्लामिक देश पाहिले तर तिथं आजही राजेशाही आहे. तसं जर शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर आज देशात लोकशाही असती का? आपलीही त्याच देशांसारखी परिस्थिती असती हे समजून घेतलं पाहिजे. जगाच्या पाठिवर छत्रपती शिवराय हे असे एकमेव राजे होते की त्यांना लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे असलं वाटलं. पण आज इथं प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थाचा विचार करतोय", असं उदयनराजे म्हणाले. 

...तर महासत्ता नव्हे, महातुकडे होतील
"जग इतक्या वेगानं पुढे जातंय लोकांनी आमचा विचार करायचं बंद केलं आहे. त्यामुळे महाराजांचा विचार अस्तित्वात राहिलेला नाही असंच सध्या दिसून येत आहे. शिवाजी महाराजांचा विचार नसता तर देश अखंड राहिला असता का? हे समजून घेतलं पाहिजे. देशाला महासत्ता बनवायचं प्रत्येकजण बोलतोय. पण छत्रपतींचा विचार पुढे नेला नाही. त्या विचारानं वागलं नाही तर महासत्ता काय देशाचे महातुकडे होतील. सर्वत्र वाताहत होईल", असं उदयनराजे म्हणाले.

Web Title: Udayanraje Bhosale says Democracy in india is only because of chhatrapati shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.