UdayanRaje Meet Deepak Kesarkar: शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? सारा महाराष्ट्र माझा आहे; उदयनराजेंची रोखठोक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 01:25 PM2022-08-12T13:25:36+5:302022-08-12T13:32:17+5:30
राज्याचे कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर पुण्यात आले होते, त्यांची उदयनराजेंनी भेट घेतली.
जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्याना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही. आता जी एकत्र आलेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, मला खात्री आहे. वेळच सांगेल . प्रत्येकाला वाटते सत्तेत रहावे. पण सत्ता का गेली, याचे चिंतन केले असते तर ही वेळ आली नसती, असे परखड मत उदयन राजेंनी पाळले. राज्याचे कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर पुण्यात आले होते, त्यांची उदयनराजेंनी भेट घेतली.
शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? असा प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी अख्खा महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? शिवाजी महाराज हे राजे होते. इथे जाणता राजा देखील एकच आहे, शिवाजी महाराज, असे वक्तव्य केले. राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा यासाठी मी केसरकरांची भेट घेतली आहे, असा खुलासा उदायन राजेंनी केला.
साताऱ्याने पहिल्यापासून महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला दिशा दिलीय. साताऱ्यातच सर्व चळवळी उभ्या राहिल्या होत्या. मी नेता नाहीय, वाटतेय का मी नेता असल्यासारखे, बघितलेय का, असा सवाल उदयनराजेंनी केला. तसेच कोणाला मंत्रिपद द्यावे कोणाला नाही ते देणाऱ्यांनी ठरवावे, मी त्या ठरवणाऱ्यांच्यात नाही, असे संभाजीराजेंना मंत्रिपद देणार का या प्रश्नावर उत्तर दिले.
मराठा आरक्षणावर नुसते जाधव, पाटील, भोसले असे पाट्या लावून फिरतात. देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनाच जातीयवादी म्हणता. मी जातपात बघत नाही. शिवाजी महाराजांनी जातपात पाहिली नाही, मग मी कसा पाहीन, असेही उदयनराजे म्हणाले.
सगळ्यांची लायकी असते, असे कसे पंकजा मुंडे काय बोलले ते माहिती नाही, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.