मराठा मोर्चाचे नेतृत्व उदयनराजे, संभाजीराजेंकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:47 AM2017-08-04T03:47:44+5:302017-08-04T03:47:48+5:30
सकल मराठा समाजातर्फे क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) मुंबई येथे काढण्यात येणाºया मोर्चाचे नेतृत्व साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे.
सातारा : सकल मराठा समाजातर्फे क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) मुंबई येथे काढण्यात येणा-या मोर्चाचे नेतृत्व साता-याचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे.
मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणा-या मराठा क्रांती मोर्चासाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवडक सदस्यांचा समावेश करुन २१० जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून उदयनराजे व संभाजीराजे यांच्याकडे सूत्रे राहतील, अशी माहिती समन्वय समितीचे संयोजक करण गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणानंतर विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळाला. लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा क्रांतिदिनी थेट मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत चक्काजाम करण्यात येणार आहे.