"लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात..."; उद्धव ठाकरेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 04:13 PM2023-06-20T16:13:35+5:302023-06-20T16:22:49+5:30

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे और दंगाबाद आहेत. यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचाय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. 

Uddhav Thackeray advised Prakash Ambedkar and criticized BJP | "लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात..."; उद्धव ठाकरेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला

"लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात..."; उद्धव ठाकरेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला

googlenewsNext

मुंबई - नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात सत्ताधारी भाजपाने या प्रकारावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. कारण उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली असून प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 

मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपासोबत आमची युती होती तेव्हा अडवाणीही जिनाच्या कबरीवर नतमस्तक झाले होते. नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात आणि प्रत्येकवेळी निवडणुकीत एखादा चेहरा चालत नसेल तर तिकडे जय बजरंग बली करायचे, कधी दाऊदचा चेहरा, कधी औरंगजेबाचा चेहरा, औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे और दंगाबाद आहेत. यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचाय असा आरोप भाजपावर करत आता स्पष्ट आणि एकाविचाराने पुढे जाण्याची गरज आहे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांना दिला.  

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्वरांची 'नावडाबाई'; अर्धवटराव टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार

...त्याआधी गोवंश हत्याबंदी करा
समान नागरी कायद्यावर आमचा आक्षेप नाही. या कायद्याने फक्त मुस्लिमांना त्रास होईल म्हणून ते आणत आहेत. आम्ही पाठिंबा देऊ. पण या कायद्याने हिंदूंना त्रास होणार की नाही हेदेखील लोकांसमोर ठेवावे. समान नागरी कायदा आणण्यापूर्वी गोवंश हत्याबंदी कायदा काश्मीरापासून कन्याकुमारीपर्यंत करा. त्रिपुरात गोवंश हत्याबंदी नाही. समान नागरी कायद्यात गोवंश हत्याबंदी कायदा असणार की नाही? समान नागरी कायदा प्रत्येक गोष्टीत व्हायला हवी. कायदा समान ठेवायचा मग त्यांच्यावरील नेत्यांवर झालेले आरोप त्याची चौकशी का होत नाही. कायदा समान ठेवा असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपावर आरोप केले.  

मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही 
राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. महिलांना शिवीगाळी करणारे मंत्री होतात पण महिला मंत्री होत नाही. हे कुठले राज्य आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली.  

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Uddhav Thackeray advised Prakash Ambedkar and criticized BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.