Uddhav Thackeray Interview: तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? उद्धव ठाकरेंनी मांडलं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 09:30 AM2022-07-26T09:30:00+5:302022-07-26T09:30:00+5:30

Uddhav Thackeray Interview: महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वीच झाला. अन्यथा जनतेने उठाव केला असता. मात्र, जनता आनंदी होती, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

uddhav thackeray answer on did fail you to become the cm or did experiment of maha vikas aghadi fail | Uddhav Thackeray Interview: तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? उद्धव ठाकरेंनी मांडलं परखड मत

Uddhav Thackeray Interview: तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? उद्धव ठाकरेंनी मांडलं परखड मत

googlenewsNext

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही ऑगस्टमध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून, पुन्हा एकदा पक्षाची मोट घट्ट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड पण भाष्य केले. 

तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला, यावर बोलताना, दोन गोष्टी आहेत. समजा मी त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं. त्यांनी आणखी काहीतरी वेगळं केलं असतं. कारण त्यांची भूकच भागत नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय? शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात? ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात. म्हणजे दिलं तरी माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, इथपर्यंत होतं. आता याचं तेही माझं आणि त्याचं तेही माझं. इथपर्यंत यांची हाव गेली आहे. या हावरटपणाला काही सीमा नसते, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला?

उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का, असा सवाल करण्यात आला. यावर बोलताना, महाविकास आघाडीचा प्रयोग जर का चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. जनतेने उठाव केला असता. तसं झालं नाही. जनता आनंदी होती, कारण आल्या आल्याच आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं. त्यानंतर मी अभिमानाने सांगेन की, कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं. म्हणून आणि म्हणूनच देशातील ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं… मी माझं नाव नाही म्हणत, पण जनतेचा मी प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. जर समजा या सगळ्यांनी सहकार्य नसतं केलं तर मी कोण होतो? मी एकट्याने काय केलं असतं? बरं, मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो. कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. 

दरम्यान, माझा अजूनही देशाच्या घटनेवर भरवसा आहे, कायद्यावर भरवसा आहे. चोरी-मारी सगळीकडेच चालते असं माझं अजिबात मत नाही. मी जे म्हटलं ना की ‘सत्यमेव जयते’… नाहीतर हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि मग एकाची दोन वाक्यं करावी लागतील. एकतर ‘असत्यमेव जयते’ आणि दुसरं वाक्य ‘सत्तामेव जयते.’ त्यामुळे सत्तामेव जयतेपुढे तुम्ही असत्य घेऊन जर काही करणार असाल तर ते लोक खपवून घेणार नाहीत. तसेच लोकं निवडणुकांची वाट पाहात आहेत. आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. लोकं म्हणतात निवडणुक येऊ द्या.. यांनाच पुरून टाकतो, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. जनताच यांना पुरून टाकेल राजकारणातून, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

आणखी वाचा: 

माझी हालचाल बंद असताना यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या; मानेतील क्रॅम्पनंतर काय-काय घडलं

बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही इतके ‘रिलॅक्स’ कसे? उद्धव ठाकरेंनी सांगितलं सिक्रेट! 

'मातोश्री'वर येण्याची तुमची इच्छा नियतीनेच पूर्ण केली?; उद्धव ठाकरे रोखठोक बोलले

Web Title: uddhav thackeray answer on did fail you to become the cm or did experiment of maha vikas aghadi fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.