शेतकऱ्यांना पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता; उद्धव ठाकरेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:46 PM2021-03-02T18:46:04+5:302021-03-02T18:47:30+5:30

शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून, महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवनात करण्यात‍ आला.

uddhav thackeray assures that we will give enough electricity to farmers | शेतकऱ्यांना पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता; उद्धव ठाकरेंची ग्वाही

शेतकऱ्यांना पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता; उद्धव ठाकरेंची ग्वाही

Next
ठळक मुद्देमहाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभशेतकऱ्यांसाठी शक्य ते निश्चितच करू - मुख्यमंत्र्यांची ग्वाहीशेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य - उद्धव ठाकरे

मुंबई :शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून, महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवनात करण्यात‍ आला. (uddhav thackeray assures that we will give enough electricity to farmers)

सर्व देश, राज्य लॉकडाऊन असताना शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कार्यालयीन कामे वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून केली जात होती. शेतकऱ्यांनी लॉकडाऊन केले असते, तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत, यासाठी त्यांच्या पाठीमागे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

नाना पटोले यांनी सांगितला GDP चा नेमका अर्थ; मोदी सरकारवर केली टीका

शेतकऱ्यांसाठी शक्य ते निश्चितच करू

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जगाचे कामाचे तास सूर्यप्रकाशात असतात आणि शेतकऱ्यांचे मात्र रात्रीचे कशासाठी. ऊन, वारा, पाऊस अशा सर्व संकटांचा मुकाबला करत तो जगासाठी सोने पिकवत असतो. त्याच्या आयुष्यात सुख, समाधानाचे क्षण कसे येतील, हे पाहणे सरकारचे काम आहे. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ, असे आम्ही होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाची ताकद मोठी असते. ती जेवढी जास्त मिळेल तेवढा काम करण्याचा हुरुप वाढतो. त्या जोरावर आम्ही शेतकऱ्यांसाठी जे जे करणे शक्य आहे ते निश्चितच करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले. 

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य असून, नुकतेच नीती आयोगासोबत झालेल्या बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाच्या शुभारंभावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते.

Web Title: uddhav thackeray assures that we will give enough electricity to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.