कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 10:57 PM2019-04-17T22:57:41+5:302019-04-17T22:58:15+5:30

शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे झालेल्या प्रचारसभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray attack on Sunil Tatkare & Congress-NCP | कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध - उद्धव ठाकरे

कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध - उद्धव ठाकरे

googlenewsNext

माणगाव - शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे झालेल्या प्रचारसभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. प्रकल्पांसाठी माझ्या कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन काही जण कारखानदार होणार आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुनील तटकरे यांना त्यांच्याकडील संपत्तीवरून लक्ष्य केले. गीते साहेब तुमच्यात आणि तटकरे यांमध्ये खूप फरक आहे. त्यांनी किती प्रॉपर्टी जमवलेली आहे. गीते साहेब तुम्हाला ते इतके वेळेस खासदार करूनही जमले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. पण काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
 
उद्धव ठाकरेंच्या सभेतील इतर महत्त्वाचे मुद्दे

- अंतुले साहेबानी कुलाबा याचे रायगड असे नाव केले असे आमचे जुने नाते 
- जयंत पाटील या मातीशी आणि जमिनीशी द्रोह करू नका
- पाकिस्तान आमचा दुश्मन आहे तसा तुमचा दुश्मन आहे
-जर उद्या युद्ध झाले पाकिस्तान टाकलेला बॉम्ब घर पाहून पडणार नाही धर्म बघून पडणार नाही. म्हणून सर्व मुसलमान बांधवांना आवाहन आहे की देशासाठी एकत्र या. 
- भविष्यात आपण नदीजोड प्रकल्प करणार 
-   आमचे भाजप सोबत मतभेद होते ते वैयक्तिक नसून ते जनतेसाठी होते आणि आताही युती सुद्धा जनतेसाठीच केलेली आहे
-  युती ही देव देश आणि धर्मासाठी केली
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी 50 ते 60 वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता केली. ते इतके माजले आहेत ते पाच वर्षात सुधारतील का ? 
-  माझ्या कोकणवासीयांची जमीन घेऊन हे कारखानदार होणार आणि माझ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार म्हणून या प्रकल्पांना विरोध
- आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. पण काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही 

Web Title: Uddhav Thackeray attack on Sunil Tatkare & Congress-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.